लेखणी भिमाची यूट्यूब ऑनलाइन राज्यस्तरीय बुद्ध भीम गायन स्पर्धेत राजू कांबळे प्रथम

33

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.18नोव्हेंबर):-चक्रवर्ती अशोक सम्राट विजयादशमी व ६४ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण ,कला ,क्रीडा व आरोग्य बहु. संस्था यांच्यावतीने लेखणी भिमाची यूट्यूब ऑनलाइन राज्यस्तरीय बुद्ध भीम गीत गायन स्पर्धा २०२० चे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये राज्यातुन अनेक गायकांनी भाग घेतला होता .त्यामध्ये वेणी खुर्द तालुका पुसद येथील राजू दत्ता कांबळे यांनी तुझीच कमाईआहे पुण्याई ग! भिमाई कुणाचेच काही इथे कष्ट नाही !! हे गीत गायले.

या गीतास यूट्यूब वर दिनांक ५ ते १५या दहा दिवसात २१४६ प्रेक्षकांनी या गीतास उत्स्फुर्त्पणे प्रतिसाद दिल्यामुळे त्यांचा राज्यस्तरीय ऑनलाईन बुद्ध भीम गीत गायन स्पर्धेत प्रथम आल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.