महाविकास आघाडीची गुरुवारी बैठक व शनिवारी ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ

34

🔸मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी वैजनाथ(दि.18नोव्हेंबर):-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ.सतिष चव्हाण यांच्या प्रचारार्थ परळीत महाविकास आघाडीची गुरुवारी(दि.१९) बैठक आयोजित करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे शनिवार दि.२१ रोजी ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ होणार आहे.

गुरुवारी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस परळी शहर कार्यालाय येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीला महाविकास आघाडीचे नेतेगण, प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.सहविचार सभा आणि पदवीधर मेळावा घेवून महाविकास आघाडीने आधीच प्रचारात आघाडी घेतलेली आहे. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत शनिवार दि.२१ रोजी प्रचाराचा शुभारंभ होणार आहे.

या पार्श्वभूमीवर पुर्वतयारी,प्रचार नियोजन तसेच प्रचारादरम्यान शहरात प्रत्येक प्रभागात पदवीधर मतदारांना गृहभेट घेतली जाणार आहे याचे नियोजन बुथ समिती आणि विविध जबाबदाऱ्या निश्चित करणे आदींबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.या महत्त्वपुर्ण बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन मराठवाडा पदवीधर मतदार संघ महाविकास आघाडी प्रचार समिती परळी वैजनाथ यांच्यावतीने करण्यात आले आहे.