गडचिरोली जिल्ह्यात आज(18नोव्हेंबर) 41 कोरोनामुक्त तर 78 नवीन कोरोना बाधित

    36

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

    गडचिरोली(दि.18नोव्हेंबर);- आज जिल्हयात 78 नवीन बाधित आढळून आले. तर आज 41 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 7049 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 6510 वर पोहचली. तसेच सद्या 466 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 73 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.35 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 6.61 टक्के तर मृत्यू दर 1.04 टक्के झाला.

    नवीन 78 बाधितांमध्ये गडचिरोली 42, अहेरी 20, आरमोरी 0, भामरागड 04, चामोर्शी 05, धानोरा 0, एटापल्ली 04, कोरची 0, कुरखेडा 0, मुलचेरा 01, सिरोंचा 01 व वडसा येथील 1 जणांचा समावेश आहे.

    आज कोरोनामुक्त झालेल्या 41 रूग्णांमध्ये गडचिरोली 26, अहेरी 1, आरमोरी 5, भामरागड 0, चामोर्शी 04, धानोरा 0, एटापल्ली 1, मुलचेरा 0, सिरोंचा 0, कोरची 0, कुरखेडा 2 व वडसा मधील 2 जणाचा समावेश आहे.

    नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील सोनापूर कॉम्पलेक्स 1 , गणेश मंदिर गोकुल नगर 4, टिचर कॉलनी अयोध्या नगर 1, रामनगर 2, बालाजी नगर चामोर्शी रोड 1, पोटेगाव 2, सर्वोदय वार्ड 2, वाकडी 1, लांझेडा वार्ड 4, शाहु नगर 3, रेड्डी गोडाऊन 4, स्नेह नगर 4, विवेकानंद नगर 01, आझाद चौक 01, स्थानिक 01, अडपल्ली गोगाव 01, डोंगरे पेट्रोल पंप 1, इंदाळा पारडी 2, पोलिस संकुल 01, राखी गुलवाडा 01, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये बोरी 1,आलापल्ली 14,प्राणहिता 03, पेरीमीली 1, स्थानिक 1,आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये 0, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 02, पीएचसी मनेराजरम 01, पोलीस स्टेशन 01, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये अनखोडा 2, आष्टी 01,स्थानिक 01, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 01, सीआरपीएफ 01, बंगाली कॅम्प 1, बसस्टॉप जवळ 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 0, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये शहीद बाबुराव हायस्कुल 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये नारायणपूर 01 तसेच वडसा तालुक्यातील बाधितामध्ये हनुमान वार्ड 01, असा समावेश आहे. तर इतर जिल्ह्यातील 5 जणाचा समावेश आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्हयातील 05 बाधितांचा समावेश आहे.