प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जिल्हा भरातील शेकडो दिव्यांग,वृद्ध, निराधारांची दिवाळी अंधारात

30

🔹राहुल साळवे.(अध्यक्ष बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड) यांचा आरोप

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.18नोव्हेंबर) :- सध्या कोरोना या महामारीमुळे नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात गत ७ महिन्यांपासून टप्याटप्याने लाॅकडाऊन घोषीत केला या लाॅकडाऊनचा सर्वाधिक फटका हा हातावर पोट असणाऱ्यां दिव्यांग, वृद्ध निराधारांना बसला आहे कारण या काळात हातचा असलेला छोटा मोठा रोजगार हि बुडाल्यामुळे अक्षरशः उपासमारीचीच वेळ त्यांच्यावर आली आहे.

शासन स्तरावरून एकिकडे दिव्यांग.वृद्ध.निराधारांना जगण्याचा आधार म्हणून संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना,श्रावनबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना यातुन दरमहा एक हजार रुपये अनुदान दिले जाते परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नांदेड जिल्ह्यातील शेकडो वृद्ध,दिव्यांग, विधवा, निराधारांना गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अनुदान मिळाले नसल्यामुळे त्यांची दिवाळी अंधारातच आली आहे.

शासन स्तरावरून शासकिय अधिकार्यांना दिवाळीचे बोनस देण्यात येत असले तरी याच शासकीय अधिकार्यांकडुन निराधारांना अणुदानापासुन वंचीत ठेवले जाते हि निंदनीय प्रकार असल्याबाबतचे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल सिताराम साळवे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे तसेच शासकीय अधिकारी तुपाशी आणि वृद्ध,दिव्यांग, विधवा,निराधार ऊपाशी हि थोर पुरूषांनी स्थापन केलेल्या या राज्याला न शोभणारी तसेच लोकशाहिला घातक अशी बाब असल्याचे राहुल साळवे यांनी म्हटले आहे.