खापरी (जांभुळे)येथिल आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत

30

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.19नोव्हेंबर):-चंद्रपूर जिल्हा महसूल कर्मचारी संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल कर्मचारी संघटना उपविभाग चिमूर यांच्याकडून चिमूर तालुक्यातील खापरी (जांभुळे) येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्य नारायण मेश्राम व त्यांची पत्नी यांना दिवाळीनिमित्य १५०० रुपयाचे धान्य कीट व रोख १० हजार रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली.

यावेळी चिमुरचे तहसीलदार डॉ. विजयकुमार सूर्यवंशी, सचिन डाहुले, तलाठी उपरे, उपविभागीय कार्यालयाचे कर्मचारी वसंत नैताम, किशोर गोंडाणे, अशोक कामडी, श्रीराम नन्नावरे, पंकज कामडी, कोतवाल संदीप कुमरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.