ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये – 1 डिसेंबर रोजी धुळे येथे भव्य मोर्चा

34

🔸अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद शिंदखेडा तालुका व शहर ची बैठक संपन्न

✒️संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)मो:-9075716526

शिंदखेडा(दि.20नोव्हेंबर):- येथील बिजासनी मंगल कार्यालय शिंदखेडा येथे सर्व ओ.बी.सी समाज बांधवांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यात खूप काळापासून ज्वलंत असलेल्या ओ.बी.सी. आरक्षण या विषयावर चर्चा करण्यात आली तसेच दिनांक १ डिसेंबर रोजी धुळे येथे आयोजित मोर्चे मध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचा संकल्प करण्यात आला.

या बैठीकीसाठी सर्व ओ.बी.सी. मध्ये तसेच अनुसूचित जाती व जमातींमध्ये मोडणाऱ्या नागरिकांनी सक्रीयरीत्या सहभाग घेतला. ओ.बी.सी. च्या हक्कासाठी सर्व समाज एकत्र आहोत याची प्रचीती आजच्या बैठकीमध्ये पाहण्यास मिळाली. सर्व क्षेत्रातील तोलामोलाचे व्यक्तिमत्व कुठलाही पक्ष व संघटनेच्या भेद न करता आजच्या बैठकीत एकत्रितरित्या सहभागी झाले.अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष श्री राजेशजी बागुल यांनी आपल्या मनोगतात ओबीसी आरक्षण या विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले.

सदर बैठकीसाठी समता परिषदेचे धुळे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल, जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दगा माळी, माळी समाज उपाध्यक्ष पांडुरंग माळी, शिंदखेडा नगरीचे उपनगराध्यक्ष श्री भिला बारकू माळी, सामाजिक कार्यकर्ते व माजी पंचायत समिती सदस्य सुभाष नागो माळी, नगरसेवक सुनील चौधरी, नगरसेवक दीपक अहिरे , जिल्हा संघटक दिनेश आत्माराम माळी, तालुका अध्यक्ष राजेंद्र चौधरी, युवकचे जिल्हाध्यक्ष योगेश बागुल, युवक तालुकाध्यक्ष प्रा, अनिल माळी , शहर अध्यक्ष गणेश खलाणे, अॅड. चंद्रकांत बैसाणे, अॅड. प्रशांत जाधव, तालुका सह्संघटक कैलास वाघ प्रकाश बोरसे, मनोज चौधरी, भूषण माळी, रवींद्र महाजन, संग्राम भिल, मनोज कुवर, मनोज चौधरी, शाम ठाकरे, राहुल माळी, न्हानभाऊ सोनवणे, रवींद्र मोरे, सोमा अवरे, मनोज सोनवणे, महारु माळी, ईश्वर माळी इ. सह सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते.

तसेच आजच्या बैठकीत भडणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आबासाहेब दत्तात्रेय ओंकार माळी यांची समता परिषद ता. संघटक पदी शिंदखेडा नगरीचे नगरसेवक दिपकजी अहिरे यांची शिंदखेडा तालुका उपतालुका अध्यक्षपदी व मालपुर शहराध्यक्षपदी गणेश खलाणे यांची निवड करण्यात आली.