कविंनी प्रबोधनाचे काम करावे

37

आज समाजात अनेक प्रश्न विकासाच्या आड येत आहेत. बेरोजगारी, भ्रष्टाचार, व्यसनाधीनता, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दहशतवाद युवकांचे प्रश्न आहेत. आजची युवाशक्ती हीेच भविष्यातील देशाचे आधारस्तंभ आहेत, तेव्हा कविंनी आपल्या कलेच्या माध्यमातून समाजप्रभोधनाचे कार्य करावे. नुकताच जागतिक कवितादिन साजरा केला गेला. परंतु विशषेतः युवकवर्ग रेकॉर्डडान्स स्पर्धा, शरीरसौष्ठव स्पर्धा तसेच पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव असलेल्या चित्रपट क्षेत्राकडे आकर्षित झालेला दिसून येत आहे. तेव्हा हे आव्हान पेलून कविंनी हे कार्य समाज हितासाठी उपयोगी पडेल, याची दक्षता घायवी.

आपल्या कवितेतून भारतीय संस्कृती, महापुरुषांचे आदर्श विचार समाजासमोर मांडावेत. त्याचबरोबर शेतकरी, दहशतवाद, स्त्रीशक्ती, राष्ट्रहित इत्यादी प्रश्नांवर प्रबोधन करावे. आपल्या दैनंदिन आयुष्यात येणारे प्रश्न, विविध क्षेत्रातील सुख:द-दुःखद अनुभव कवींनी जनमाणसासमोर आपल्या काव्यातून सादर करावेत, याचा निश्चितच सकारात्मक परिणाम होताना दिसेल.

तसेच देशात बिकट परिस्थिती असलेले प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांची व्यथा, जवानांचे शौर्य, शासनाची जबाबदारी इ. विषयांवर आपल्या काव्यातून वाचा फोडावी तेव्हा शासनाबरोबरच विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, समाजातील जाणकार नागरिक यांनीही कवींना मोलाची साथ द्यावी व त्यांच्या कलेचा आदर राखावा, तेव्हा कविंनीही हे आपले आद्यकर्तव्य समजून नि:पक्ष व निर्भीडपणे समाजप्रबोधनाचे कार्य अविरतपणे चालू ठेवावे हीच सदिच्छा…!!

✒️लेखक:-अमोल मांढरे.(७७०९२४६७४०),वाई.