पंजावाडी येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती साजरी

29

🔸बिरसा क्रांती दलाच्या वतीने आयोजन

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.20नोव्हेंबर):- तालुक्यातील पंजावाडी येथे क्रांतीसुर्य, क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची १४५ जयंती बिरसा क्रांती दल शाखा पंजावाडी यांच्या वतीने साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच किसन काळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच प्रकाश बेले, वसंता आढाव ,शेषराव आगोसे ,पांडुरंग बेले ,वाघजी काळे ,उकंडा आढाव, राम गवळी उपस्थित होते.

सर्वप्रथम क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे सर्व मान्यवरांनी पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी शाखाध्यक्ष विजय देवतळे, उपाध्यक्ष किसन काळे, महासचिव संदीप बेले, संघटक समाधान आढाव तसेच ज्ञानेश्वर बेले,किसन आढाव, रितेश काळे, वाघजी ढगे ,विष्णु बळी ,संतोष बेले ,युवराज आढाव तसेच इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप बेले यांनी केले. तर आभार किसन काळे यांनी मानले.