उपळवे होलार समाजातील अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणात कुटुंबास तीन महिने पुरेल एवढे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

    44

    ?सहाय्यक आयुक्त उबाळे व आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते विकास धाइंजे यांच्या हस्ते वाटप

    ✒️संजय कांबळे माकेगावकर(अहमदपूर प्रतिनिधी)मो:-9860208144

    अहमदपूर(दि.21नोव्हेंबर):-उपळवे गावात 3 ऑक्टोबर रोजी मुलगी बेपत्ता झाल्याने आई वडिलांनी फलटण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती.8 ऑक्टोबर रोजी संबंधित मुलीचा मृतदेह गावाजवळील एका विहिरीत सापडला.मृतदेहाची अवस्था संशयास्पद होती,त्या मुलीच्या कमरेला दगड बांधले होते,तरीही स्थानिक पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचा गुन्हा दाखल केला.कारण संशयित आरोपी हा सवर्ण समाजातील तर पीडित मुलगी ही अनुसूचित जातीतील हिंदू होलार समाजातील आहे.उपळवे ता.फलटण या गावात होलार समाजाचे एकच घर आहे.इथेही जातीचे राजकारण करण्यात आले.

    पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे भा.द.वि 305 हे कलम लावलेले आहे.मुलगी होलार समाजातील असल्याने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 नियम 1995 संशोधित अधिनीयम 2015 मधील कलम 3 (1)r, व 3 (2)v नुसार कलमे लावली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधीकारी फलटण हे करीत आहेत.पीडित कुटुंबाने केलेल्या आरोपांवरून पोलिसांचे तपासाचे कामकाज संशयास्पद वाटत आहे.

    त्यामुळे या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक सामाजिक संघटना व पक्ष पुढे आले आहेत, नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव गीते यांनी ही गंभीर बाब सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी यांच्याशी फोनवरून चर्चा केली असता दोन तासात समाजकल्याण अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले.वैभव गिते यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक (ग्रामीन)सातारा यांच्याकडे आरोपीची लाय डिटेक्टिव्ह चाचणी, नार्को टेस्ट, पॉलिग्राम चाचणी या प्रकारच्या चाचण्या आधुनिक पद्धतीने करून ही आत्माहत्या न्हवे तर हत्या आहे.

    याचे पुरावे गोळा करावे या मुख्य मागणी सह पीडित कुटुंबाचे सामाजिक आर्थिक पुनर्वसन करून गुणवत्तेच्या आधारे परिस्थिती जन्य पुरावे गोळा करून दोषारोपपत्र मे.विशेष न्यायालयात दाखल करण्यापूर्वी पोलीस अधीक्षक कोल्हापूर परीक्षेत्र नागरी हक्क संरक्षण यांच्याकडे पाठवून त्यांनी सांगितलेल्या त्रुटींची पूर्तता करूनच दोषारोपपत्र मे.विशेष न्यायालयात दाखल करावे.उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण हे जर तपासात कसुरी करीत असल्यास त्यांच्याकडून तपास काढून सातारा जिल्ह्यातील इतर कर्तव्यदक्ष डी.वाय.एस.पी यांच्याकडे देण्यात यावा.अशा मागण्या केल्या.

    ऍड.सुजित नीकाळजे यांनी पीडित कुटुंबास कायदेशीर सल्ला देत सर्वतोपरी कायदेशीर मदत करण्याचे आश्वासन दिले होते.एन.डी.एम.जे संघटनेने दिलेल्या निवेदनाची दखल घेत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी श्री उबाळे यांनी अहिवळे कुटुंबास तीन महिन्यांच्या जीवनावश्यक वस्तू मंजूर करण्यासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे पाठवला जिल्हाधिकारी यांनी तात्काळ मंजुरी दिली यामध्ये गहू 108 किलो तांदूळ 27 किलो मुग डाळ 10 किलो तूर डाळ 10 किलो पोहे सहा किलो रवा 6 किलो शेंगदाणे 4 किलो गोडेतेल 18 किलो मीठ पाच किलो तिखट 9 किलो व इतर जीवनावश्यक वस्तू आज फलटण मुलांचे वसतिगृह येथे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी श्री उबाळे,आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते माळशिरस शहराचे माजी सरपंच विकास दादा धाइंजे,ऍड.सुजित निकाळजे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

    यावेळी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव तानाजी गिते,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड,समाजकल्याण निरीक्षक श्री आढाव,दलित पँथर चे अध्यक्ष मंगेश आवळे,पीडित कुटुंबास सर्वतोपरी कायदेशीर मदत करणारे ऍड.सुजित निकाळजे,नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय झेंडे,उपळवे गावचे प्रतिष्ठित व्यावसायिक बापूराव जक्ताप,रोहित साळे यांच्या उपस्थितीत अहिवळे कुटुंबास तीन महिने पुरेल एवढे अन्न-धान्य व जीवनावश्यक वस्तू पुरवल्या लोकप्रिय नेते वैभव गिते यांनी प्रास्ताविक करीत शासनाचे व सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी श्री उबाळे साहेब व निरीक्षक हेळकर साहेब यांचे आभार मानले.फलटण वसतिगृह अधिक्षक श्री कांबळे यांनी चोख व्यवस्था केली होती.