राज्याचा मुख्यमंत्री राज्य चालवतो की मंत्री हे जाहीर करावे – अ‍ॅड प्रकाश आंबेडकर

    37

    ✒️समाधान गायकवाड(विशेष प्रतिनिधी)मो:-8552862697

    अकोला(दि.21नोव्हेंबर):- राज्यातीबआघाडीचे सरकार हे विरोधकांच्या अजेंड्यावर चालणारे सरकार आहे. अशी खोचक टिका वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी उध्दव ठाकरे सरकार चालवित आहे की बाहेरचे लोक असा प्रश्न उपस्थित केला.

    महाविकास आघाडीचे सरकार विरोधक चालवित आहे. सरकारने स्वतः काही बाबतीत निर्णय घेण्याची गरज आहे. तसे होताना दिसत नाही. विरोधक मागणी करतात मग त्या मागणीचा पाठपुरावा सरकार करते. म्हणजेच हे सरकार स्वतःहून चालविले जात नसून ते विरोधकांद्वारे चालविले जात असल्याचा आरोप अ‍ॅड.आंबेडकर यांनी केला.

    महावितरण कंपनीने कोरोना संकटात जनतेला विज बिलात पन्नास टक्के सुट देण्यास तत्वतः मान्यता दिली होती. त्या संदर्भातील एक फाईल व त्यावरील शेरा हा विचारात घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला विज बिलासंदर्भात मोठा दिलासा द्यावा. पण, या संदर्भातील ती फाईल राज्यातील एका मंत्र्यांने दाबल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

    राज्याच्या उर्जा मंत्र्यांना महावितरण कंपनीने सुट देण्यासंदर्भात व ती सुट दिल्याने कुठलाही फरक पडणार नाही, असा शेरा असलेली फाईल माहिती नाही. त्यामुळे पहिले सुट देण्याची घोषणा केल्या गेली व आता पुर्ण वीज बिल भरण्याचा आदेश उर्जा मंत्री देत आहे. अशा वेळी राज्यातील जनतेच्या पाठिशी वंचित बहुजन आघाडी राहणार आहे. जनतेने वीज बिल भरु नये. वीज बिल न भरल्यास जोडणी तोडल्यास वंचित ही जोडणी पुन्हा जोडून देईल, अशी ग्वाही अ‍ॅड.आंबेडकर यांनी दिली. वीज बिल माफी संदर्भात राज्यातील उर्जा मंत्र्यांची भूमिका दूटप्पी आहे. हे राज्याचे दूर्दैव असल्याची टिका ही त्यांनी केली.

    राज्याचा कारभार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे चालवित आहे काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राज्यातील एक मंत्री ज्याने ही फाईल दाबली तो राज्याचा कारभार चालवित आहे काय अशी विचारणाच यावेळी अ‍ॅड.आंबेडकर यांनी केली. महाविकास आघाडी सरकारचा कारभार कोण चालवित आहे. असा प्रश्न अ‍ॅड.आंबेडकरांनी विचारला आहे. या पत्रकार परिषदेला प्रदेश प्रवक्ते व युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे,जि.प.अध्यक्षा प्रतिभा भोजने, डॉ.धैर्यवर्धन पुंडकर, प्रमोद देंडवे, प्रदीप वानखडे, चंद्रशेखर पांडे, राम गव्हाणकर, आदींची उपस्थिती होती.