बेला मंडल तेलंगणा युवा मोर्चा कडून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांचा सत्कार

29

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-९६२३८९६५७४

कोरपना(दि.21नोव्हेंबर):- भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा बेला मण्डल अध्यक्ष श्री नवीन पोतराजवर व इतर पदाधिकारी यांनी नवनिर्वाचित श्री नारायण हिवरकर भाजपा जिल्हाउपाध्यक्ष यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

व अभिनंदन केले पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या प्रमुख उपस्थिती श्री नवीन पोतराजवार युवा मोर्चा अध्यक्ष तालुका बेला,श्री सादिक भाई अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष मंडल बेला,श्री जीवनजी दरणे सोशल मीडिया प्रमुख मंडल बेला,श्री संदीप भाऊ ठाकरे युवा मोर्चा महासचिव मंडळ बेला,श्री हरीश मडावार अखिल भारतीय विद्यार्थी अध्यक्ष मंडळ बेला,श्री शिवारेड्डी माजी अध्यक्ष,श्री अक्षय गावंडे शाखा अध्यक्ष मांगरूळ आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

श्री नवीन पोतराजवार यांनी आपल्या मनोगतात श्री नारायण हिवरकर हे आमचे सहकारी नेते असुन आम्हाला वेळोवेळी सहकार्य करत असतात यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये चांगल्या प्रकारे काम करून अनेक पदे भूषविली व ते लोक प्रतिनिधी म्हणून सरपंच उपसरपंच सदस्य व इतर सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन वरिष्ठ नेत्यांच्या सहकार्याने शाखा अध्यक्ष ते जिल्हा उपाध्यक्ष पर्यंत मजल गाठली असून एक गौरवाची गोष्ट आहे आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे.

आम्ही युवा मोर्चाच्या वतीने माननीय श्री नारायण हिवरकर नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन तसेच पेढे भरून सत्कार केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा दिल्या असे मनोगत व्यक्त केले तसेच इतर मान्यवरांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.