चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे दोन मृत्यू

25

🔺मृत झालेल्या बाधितामध्ये ब्रह्मपुरी येथील 65 वर्षीय पुरुष व घुग्गुस येथील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश

🔺आज (21 नोव्हेंबर) रोजी 175 नव्याने कोरोना पॉझिटिव्ह

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.21नोव्हेंबर):-जिल्ह्यात मागील 24 तासात 369 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 175 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 18 हजार 504 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 16 हजार 348 झाली आहे. सध्या एक हजार 976 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 38 हजार 521 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 15 हजार 389 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्या बाधितामध्ये ब्रह्मपुरी येथील 65 वर्षीय पुरुष व घुग्गुस येथील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 280 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 260, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 11, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

नागरिकांनी बाहेर निघतांना काळजी घ्यावी, मास्क लावणे, हात धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.