वाशिम वरून चालतो पुसद वखार महामंङळाचा कारभार

35

🔹एकाच साठा अधिक्षकाकङे वाशिम जिल्हा व पुसद तालुक्याचा कारभार

🔸पुसद वखार केंद्राचा कारभार रामभरोसे

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.21नोव्हेंबर):- येथील वखार महामंडळ यांचे गोदाम असून तिथे एकच साठा अधीक्षक हे महामंडळाचे कर्मचारी आहे. बाकी सर्व कंत्राटी कर्मचारी आहे. पुरंतु मागील ४ महीन्यापासून पुसद येथील साठा अधीक्षक यांच्याकडे वाशीम येथील वखार केंद्रांचा कारभार सुद्धा दिलेला आहे . या अगोदर संबंधित साठा अधीक्षक वाशिम येथे होते. त्यामुळे त्यांना वाशिमची जास्त गोडी आहे ,आठवड्यातील चार-पाच दिवस ते वाशिम येथे राहतात एक ते दोन दिवस पुसद येथील वखार केंद्राला भेट देतात.

त्यामुळे तेथील ठेवीदारांना या बाबींमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच संबंधित साठा अधीक्षक व कंत्राटी कर्मचारी यांच्यावर चोरीच्या अनेक तक्रारी मुख्यालय पुणे येथे देण्यात आले आहे . तरीसुद्धा त्यांच्यावर कोणतीही कारवाई अद्याप पर्यंत झालेली नाही. विशेष म्हणजे या अगोदर पुसद केंद्र येथे एक साठा अधीक्षक एक भांडारपाल व चतुर्थश्रेणी कर्मचारी अशी एकूण तीन पदे होते तरीसुद्धा येथे २००६ मध्ये या वखार महामंळात चोरी प्रकरण उघडकीस आले होते. व २०१० मध्ये कापूस गठाणीचे आग लावून देण्याचे प्रकरण घङले होते. तरीसुद्धा पुसद वखार केंद्र येथे आज रोजी एकच साठा अधीक्षक हे पद महामंडळाचे असून उर्वरित पदे हे कंत्राटी आहेत.

त्यामुळे येथे २००६, २०१०होण्यास विलंब लागणार नाही तसेच संबंधित ठेवीदार व शेतकरी यांना गोदामात माल ठेवल्याची वखार पावती ही त्वरित देणे बंधनकारक असते परंतु पुसद वखार महामंळात असे होताना दिसत नाही. कारण साठा अधीक्षक हे आठवड्याची पाच दिवस वाशिम येथेच असतात त्यामुळे शेतकऱ्यांना दोन-तीन दिवस वखार पावतीसाठी वाट पहावी लागत आहे. व त्यामुळे शेतकरी व व्यापारी यांना बँकेतून लोन घेण्यासाठी विलंब होत आहे .कोरोना या महामारीच्या काळात आर्थिक मंदी चालत असताना शेतकरी सावरण्याचा प्रयत्न करीत आहे.

परंतु महामंडळाच्या चुकीच्या धोरणामुळे पुसद येथील शेतकरी व व्यापारी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व प्रकारची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून दोषीवर कारवाई करावी बाबीकडे शासनाने लक्ष द्यावे तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी याच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी ठेविदार करत आहे.