परळी महावितरण कार्यालयात ग्राहकांची प्रचंड लुट महाघोटाळ्याची चौकशी करा – वसंतराव मुंडे

30

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.21नोव्हेंबर):- महावितरण उपविभागात मागील दोन वर्षांपासुन मिटर बदलने,वाढीव वीजबिलबाबत मिटर टेस्टींगच्या नावाखाली लुट करणे,तपासलेल्या मिटरचा रिपोर्ट न देणे अशा अनेक सबबीखाली वीजग्राहकांची प्रचंड आर्थिक लुट केली जात असुन या घोटाळ्याची चौकशी करुन दोषी अधिकार्यावर कारवाई करावी अशी मागणी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते वसंतराव मुंडे चेअरमन श्रम रोजगार मंञालय भारत सरकार नाशिक विभागाचेे यांनी केली आहे.

परळी महावितरण उपविभागात येत असलेल्या परळी शहरामध्ये 2018-2019 मध्ये जुने झालेले वेगवेगळ्या कंपन्यांचे मिटर बदलण्यात आले.परंतु अनेक ग्राहकांना अनेक पटीने जास्तीचे बिल आल्याने हजारो ग्राहकांनी तक्रारी केल्या ज्या ग्राहकांचे वाढीव वीज बिल आले त्या ग्राहकांना परळीतील अधिकार्यांकडून तुम्ही टेस्टींगचे पैसे भरा तुमचे मिटर टेस्टींग ला पाठवू असे सांगण्यात आले मात्र हजारो ग्राहकांकडून महावितरणने पैसे भरून घेतले परंतू ग्राहकांचे मिटर तर टेस्टच केले नाहीत आणि वीज बिल दुरूस्ती केली नाही तसेच अनेक ग्रहकांचे मिटरचे डिस्पले गेलेले असताना देखील त्यांचे मिटर तपासणीस पाठवले नाही.

मात्र त्यांच्याकडून पैसे भरून घेतलेले आहेत काही ग्राहकांचे मिटर तर कार्यालयातून गहाळ सुध्दा केलेले आहेत. एवढेच नव्हे तर अनेक ग्राहकांचे मिटर तपासले मात्र त्यांना त्याचा रिपोर्टच देण्यात आलेले नाहीत यासाठी ग्राहकांकडुन वेळोवेळी पैसे वसुल केलेले आहेत.महावितरणच्या परळी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमतानेच ही लुट होत असुन महावितरण कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.या घोटाळ्याची चौकशी करुन दोषी अधिकार्यावर कारवाई करावी अशी मागणी कॉंग्रेसचे जेष्ठ वसंतराव मुंडे यांनी केली आहे.