नाशिक येथे उतरंड या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनेते मा.सुदामजी वाघमारे यांचा सत्कार

27

🔹खैरलांजी प्रकरणावर आधारीत उतरंड हा चित्रपट अवश्य बघावा – ङाॅ राजेश साळुंके यांचे आवाहन

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.21नोव्हेंबर):- नुकतेच नाशिक शहरामध्ये आपल्या खाजगी कामानिमित्त उतरंड ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक तथा जेष्ठ अभिनेते श्री. सुदामजी वाघमारे हे सपत्निक आले असता, ङाॅ राजेश साळुंके यांच्या वार्तापञ शोधांश पञकार ,पोलीस टाईम्स न्युज, चाणक्य कलामंच ,राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ कार्यालय येथे धावती भेट दिली . राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष व वार्तापञ शोधांश पञकार याचे मुख्य संपादक ङाॅ राजेश साळुंके व पोलीस टाईम्स न्युज संपादक निभिॅङ पञकार , दैनिक महाभारत नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांतारामभाऊ दुनबळे यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार समतानगर आगर टाकळी नाशिक येथे केला.

ह्याप्रसंगी नाशिक महानगर पालीका नाशिकचे नगरसेवक मा.श्री.राहुलभाऊ दिवे , महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक संतोषजी जोंधळे, संजयजी आव्हाड – सिने पाश्वगायक, आंबेडकर राईटस ह्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.कैलासभाई पगारे, विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.संतोषजी निकम,राज्य प्रदेश उपाध्यक्ष पत्रकार ङाॅ राजेश साळुंके ,पञकार शांतारामभाऊ दुनबळे,युवा नेते राहुलभाऊ खाडे, निफाङ येथील पञकार कार्यक्रमाचे संयोजक मनोहर देसले सर,प्रसादजी बोडके, शिवाजी गायकवाड रेडिओ संवादचे जॉकी संदीपजी इंगळे , विश्वरत्न बहुउद्देशिय संस्था नाशिकचे विश्वस्त – संतोषजी वाळवंटे ,विकासजी गायकवाड- गायक , अनिल गांगुर्डे , सौ.सुचिताताई सांळुके, सौ.मंगलताई आव्हाड, सौ.मंदाताई झुरडे ,पुजाताई गांगुर्डे,आदी पञकार, समाजसेवक, सांस्कृतिक ,शैक्षणिक ,धार्मिक ,राजकीय असे विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते.

मान्यवर मंडळींनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच मा.श्री. सुदामजी वाघमारे – दिग्दर्शक यांनी उतरंड चिञपटाविषयीचे आपले मनोगत व्यक्त केले.सिनेगायक संजयजी आव्हाड व विकासजी गायकवाड यांनी जुन्या आणि नविन गिताने कार्यक्रमाची सुरूवात व सांगता केली. कार्यक्रमाचे सुञसंचालन पञकार ङाॅ राजेश साळुंके यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोलाची साथ पञकार शातांरामभाऊ दुनबळे व मनोहर देसले यांनी विशेष परीश्रम घेतले.