गडचांदूर पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या अनेक गावात व शहरात एका फोनवर होते दारू उपलब्ध

30

🔹ठाणेदार गोपाल भारतीचा आशिर्वाद?

🔸पोलिस विभाग घेत आहे झोपेचे सोंग की अर्थपूर्ण तडजोड?

( पोलिस पंचनामा भाग-१)

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-९६२३८९६५७४

गडचांदूर (22 नोव्हेंबर )-चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे.परंतु गडचांदूर पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या अनेक गावात व गडचांदूर शहरात ठिकठिकाणी एका फोनवर दारू उपलब्ध होते असे चित्र बघायला मिळत आहे. गोपाल भारती ठाणेदार पोलिस स्टेशन मध्ये रुजू झाले तेव्हा पासून गडचांदूर शहरात व परिसरातील अनेक गावात अवैध दारू वाले अवैध दारू जोमाने विकत आहे. गडचांदूरात यवतमाळ, वणी व तेलंगणातुन मोठ्या प्रमाणात अवैध दारू तस्कर किरकोळ दारु विक्री करणाऱ्यांना दारू पुरवठा करीत असल्याची चर्चा शहरात व परिसरातील अनेक गावात सुरू आहे.

मोठया प्रमाणात बनावट दारू सुध्दा गडचांदूर शहरात उपलब्ध होत आहे.पोलिस स्टेशन लागुन चौकात खुलेआम दारू विक्री केली जात असुन सुद्धा कसल्याच प्रकारची पोलीसांची भिती दारू विक्रेत्यांना राहिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात जिथे म्हटले तिथे गल्लीबोळात चौका -चौकात बस स्थानक, पेट्रोल पंप चौक, कुठे पण दारू खुलेआम मिळत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.तरी मात्र पोलिस विभागाकडून झोपेचे सोंग घेतल्याची भुमिका घेतली जात असल्यामुळे अवैधरित्या दारू विक्री जोमात सुरू आहे.

प्रशासन मात्र थातुरमातुर कारवाई करुन आपण केलेली कारवाई योग्यच असल्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांना भासवून येथील अटृल दारू विक्रेत्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. मद्यपी आपली हौस भागवण्यासाठी ठरवून दिलेल्या किंमती पेक्षा दुप्पट पैसे देऊन दारू विकत घेत आहेत.

अश्यातच दारू विक्रेत्ये दुप्पट नफा कमावित असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनामुळे विस्कळीत झालेला सामान्य माणसाचा नीट उभा होत असलेला सुखी संसार चा डोलारा पुन्हा कोसळायला सुरुवात होणार काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मोठया प्रमाणात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का अशी चर्चा जनतेत सुरू आहे.

🔹चंद्रपूर जिल्ह्यातील अन्य पोलिस ठाण्याचे हद्दीत सुध्दा असाच प्रकार सुरू असल्याची खात्री पूर्वक चर्चा सुरू आहे. सामान्य नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की, लेखी स्वरूपात फोटोसह माहिती दिली तर आम्ही अवश्य प्रकाशित करण्यात येईल. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव उघड करण्यात येणार नाही, ही आमची नैतिक जबाबदारी असेल.
-सुरेश डांगे
संपादक-पुरोगामी संदेश
मो.8605592830
Purogamisandesh@gmail.com