पोचमपल्ली-कलेश्वर मेडिगड्डा जलप्रकल्प शेतकऱ्यांना वरदान की शाप

30

🔹रा.का.पक्ष तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी यांचा सवाल

🔸आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी मेडिगड्डा जलप्रकल्प बाबत हिवाळी अधिवेशनात घडवून सविस्तर चर्चाव विभागिय चौकशी करण्यात यावा अशी केली मागणी

✒️विजय तोकला(विशेष प्रतिनिधी)मो:-9403477377

मेडिगड्डा(दि.23नोव्हेंबर):- महाराष्ट्र राज्याचे गेल्या मागील सरकारच्या काळात झालेल्या मेडिगड्डा जलप्रकल्प त्या प्रकल्पाविरुद्ध अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन केले होते, गेल्या मागील(वीस) पक्षाने शेतकऱ्यांना दिशाभूल करून मेडिगड्डा जलप्रकल्प बांधण्यास सुरुवात केली. अखेर शेतकरी त्या मेडिगड्डा जलप्रकल्पमुडे जमीन व इतर व्यवसायाला नुकसान सहन करावा लागला आहे. सिरोंचा तालुक्यातील नदीकाठी असलेल्या जमीन मोजमाप झाल्यानंतरही शेतकऱ्यांला शेतीचा खरिभाव भेटत नसल्याची तक्रार आहे.

उदा.(पोतूलोला सेन)शेती पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने त्यांचा अतोनात नुकसान झाले आहे. भोई बांधवाना मत्स्यव्यवसाय करू देत नाही. तेलंगणा सरकार असही तक्रार असल्याचे दिसून येते.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी अनेकदा संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने दिल्या गेले. अखेर अहेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यामन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी मेडिगड्डा जलप्रकल्प बाबत हिवाळी अधिवेशनात सविस्तर चर्चा केल्या व त्याबाबत विभागिय चौकशी करण्यात यावा अशी मागणी केली.

आरडा:-गेल्या दोन तीन दिवसापूर्वी मेडिगड्डा जलप्रकल्पाचे दार बंद केल्याने नदीकाठी असलेल्या सर्व शेतामध्ये पाणी शिरले. प्रकल्प शेतकऱ्यांला वरदान की शाप समजत नाही.शेतकऱ्यांला शेताचे धान, मिरची,कापूस व इतर पीक हातात येत्यावेळी अचानक आलेल्या पाण्यामुळे शेतकरी हवालदिल झालं अश्या परिस्थितीत शेतकरी संबंधित अधिकाऱ्यांना नुकसान भरपाईसाठी निवेदन दिले आहे. करिता शासनाने याकडे दुर्लक्ष न करता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी व तालुक्यातील आरडा ग्रामस्थांनी मागणी केली.