भारतीय जनता पार्टी दोंडाईचा वीजबिलाची होळी आंदोलन

102

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.23नोव्हेंबर):- शहरातील लाॅकडाऊनच्या काळात राज्यातील नागरीकांना भरमसाठ वीजबिले आलेली आहेत. लाॅकडाऊनमुळे अर्थिक तणावाखाली असलेल्या नागरिकांना महाविकास आघाडी ने हा मोठा शाॅकच दिलेला आहे. या बाबत महाराष्ट्रातील जनतेत जनआक्रोश निर्माण झाला आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वास घात केलेला आहे. महाविकास आघाडी सरकारने लाॅकडाऊन काळात दिलेले भरमसाठ वीजबिल माफ करावे किंवा बीलात योग्य सवलत द्यावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी दोंडाईचा तर्फे दि.२३ नोव्हेंबर, सोमवार रोजी दुपारी १२ वाजता अपर तहसीलदार कार्यालय दोंडाईचा येते येथे “वीजबिलांची होळी आंदोलन” करण्यात करण्यात आले.

तरी शिंदखेडा तालुक्यातील सर्व जि प व प स सदस्य, नगरसेवक, बाजार समिती संचालक, सर्व पदाधिकारी, नगरसेवक, सकार्यकर्ते आपण आपली वीजबीलांची झेरॉक्स copy घेऊन मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले.

प्रमुख उपस्थिती श्री.आ.जयकुमारभाऊ रावल प्रदेश उपाध्यक्ष भाजप तथा माजी मंत्री,श्री.नारायण बाजीराव पाटील जिल्हाध्यक्ष(ग्रामीण),डी एस गिरासे जिल्हा संघटन सरचिटणीस भाजप धुळे,श्री.कामराज निकम माजी जि प सदस्य धुळे,श्री.अनिल वानखेडे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा,श्री प्रवीण भाऊ महाजन दोंडाईचा शहराध्यक्ष,श्री. पंकज भाऊ चौधरी दोंडाईचा सरचिटणीस,श्री जितेंद्र गिरासे आरोग्य सभापती दों. हितेंद्र महाले नगरसेवक दों.नरू गिरासे नगरसेवक दों.व कार्यकर्ते उपस्थित होते.