गोदावरी नदी पात्रात अनोळखी महिलेचे प्रेत सापडले

26

🔺कुंडलवाडी ठाण्‍यात आकस्‍मात मृत्‍युची नोंद

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

कुंडलवाडी(दि.23नोव्हेंबर):- शहरापासुन जवळच असलेल्‍या शेळगांव जवळील गोदावरी नदीपात्रात दिनांक २१/११/२०२० रोजी ४५ वर्षीय एका अनोळखी महिलेचे प्रेत सापडले असुन शेळगाव थडीचे पोलीस पाटील व्‍यंकट राजूरे यांनी पोलिसांना दिलेल्‍या माहितीवरुन कुंडलवाडी पेालीस ठाण्‍यात गु.र.नं. ८/२०२० कलम १७४ सी.आर.पी.सी प्रमाणे आकस्‍मात मृत्‍युची नेांद केली आहे.

मयत महिलेचे खाली प्रमाणे वर्णन असुन केस काळे पांढरे,रंग सावळा,वय अंदाजे ४५ ते ५० अंगात पेाशाखा हिरव्‍या कलरची नववारी साडी,व हिरव्‍या कलरची चोळी,काळया धाग्यामध्‍ये ताईत,कानात पिवळया धातूचे फुले,पायात धातुचे जोडवे,दोन्‍ही हातावर गोदलेले फुलाचे डझाईन, बटव्‍यामध्‍ये एक पिवळसर धातूचे मंगळसुत्र्,सदर मयत महिलेच ओळख पटल्‍यास कुंडलवाडी पोलिस ठाण्‍यात सपंर्क साधावे,पुढील तपास स.पो.नि.सुरेश मांटे यांच्‍या मार्गदर्शनाखाली एस.एल.चव्‍हाण हे करित आहेत.