दोंडाईच्यात चोर मचाये शोर,पोलीसांचा मात्र प्रोसेस कामात जोर

31

🔺स्टेशन भागातील मिठाईसह दोन दुकाने फोडली

🔺नगरसेवक टारगेटसह सर्वसामान्य नागरिक भयभीत

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.23नोव्हेंबर):-येथे शहरात मागील काही महिन्यांनपासून चोऱ्यांचे सत्र काही करता,थांबता -थांबत नाही आहे. काल नुकतेच नगरसेवकाच्या गँस एजन्सीमध्ये धाडसी वीस लाखाच्या आत मुद्देमालाची चोरी करत, स्थानिक पोलीसांना आव्हान देत नाही. तेच आज सकाळी परत बसस्टँड शेजारील नेहमी गजबजलेल्या दादासाहेब रावल कुषी ऊत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी गाळयातील न्यु बिकानेर स्वीट व मंगलमूर्ती मेडीकलचे शटर तोडत लाख रूपयापर्यतंच्या वस्तूंची चोरी करण्यात आली आहे. वरील दोघी दुकानदार भारतीय जनता पार्टीचे जबाबदार पदाधिकारी आहेत.म्हणून एकीकडे चोर, नगरसेवकांना टारगेट करत ,करत आता सर्वसामान्य नागरिक पदाधिकाऱ्यांनाही सोडत नाही आहे. म्हणून गावात चोरांचे राज्य आहे की काय?असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकाला पडत,चौफेर चोर मचाये शोर ,अशी भययुक्त परिस्थिती निर्माण होत.

आज दिनांक २३नोव्हेंबर रोजी सकाळी नेहमीप्रमाणे न्यु बिकानेर स्वीटचे मालक कल्याणसिंग, खंग्गारसिंग नोकरासोबत दुकान उघडायला आले आसता .त्यांना आपल्या दुकानाचे शटर अर्धवट अवस्थेत तोडलेल्या स्थितीत आढळले.तसेच समोरील. मंगलमूर्ती मेडीकलही त्याच पद्धतीने तोडलेले दिसले. त्यांनी तातडीने लगेच मेडीकलचा मालक व पोलीसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर दुकानात काय ,काय चोरी गेले आहे. याचाही सुगावा घेतला. यावेळी घटनास्थळी दोंडाईचा पोलीस स्टेशनचे प्रो.एसपी श्री पंकज कुमावत, पोलीस उपनिरीक्षक मोरे आदींनी भेट देत ,गुन्हा दाखल करायच्या पुढील तयारीला लागले आहेत.
लाँकडाऊन काळापासून चोरांनी गावात पाय जमवत.

सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक त्रास देणारा, चोऱ्या करण्याचा धंदा, सपाटा आजपर्यंत सुरु ठेवला आहे. लाँकडाऊन काळात त्यांनी स्टेशनभागातील निलेश बियर शाँपी, मातोश्री एंटरप्राईजेस, बँटरी दुकान, गोविंद नगरमधील मोटरसायकल चोरी, मार्केट गेटसमोरील लालचंद भावनदास ट्रडर्समधून संत्तर हजार रुपये किमतीचे तुवरदाळ, जिरे कट्टयाची चोरी, आविश्री सुपर शाँपी, दिपक गिरासे यांचे साई मोबाईल, अँड इलेक्ट्रॉनिक दुकान, ज्ञानेश्वर गिरासे यांचे गुरूकुपा मोबाईल दुकान यासह इतर ठिकाणीही चोऱ्या झाल्या आहेत. त्यापैकी काही कागदावर आल्या आहेत तर काही कागदावर घेतल्या गेल्या नाही. ज्यांचा तपास आजपर्यंत लागलेला नाही आहे.

मात्र मागील महिन्यांनपासून चोरांनी नगरसेवक ,लोकप्रतिनिधी यांना टारगेट करत चोऱ्यांचे सत्र सुरु ठेवले आहे. मागे माजी नगरसेवक श्री विजय मराठे यांच्या मुलाची अडीच लाख रुपये किमंतीची बुलेट गाडी, नंतर सिंधी काँलनीमधील स्विकूत नगरसेवक श्री गिरधारी रूपचंदानी यांच्या आँईलमीमधील कैलास ट्रेडर्समधून ९६ कट्टे तांदुळाची चोरी, व काल नगरसेवक सुफीयान तडवी यांच्या इशरियाज गँस एजन्सीमधून वीस लाखाच्या आतील धाडसी चोरी तसेच आज भाजपाचे खंबीर पदसदस्य असलेले दोघी दुकानादारांकडे चोरी म्हणजे नगरसेवक ,लोकप्रतिनिधी यांना टारगेट करत चोर दिवाळी तर साजरी करत नाही आहे, अशी शंका सर्वसामान्य नागरीक व्यक्त करत आहे. म्हणून एकीकडे जर नगरसेवक लोकच सुरक्षित नसतील तर सर्वसाधारण व्यापारी, नागरिक कुठून सुरक्षित राहतील, अशी भितीयुक्त जनभावना तयार होत आहे. दोन दिवसापुर्वी सराईत चोर, गावगुडंकडून राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयावर हल्ला चढवण्यात आला.त्यात सुदैवाने कोणाच्या जीवास ईजा झाली नाही.

पण आजही त्या घटनेची दहशत लोकांच्या मनात घर करून आहे. म्हणून गाव पाहिजे ,तेवढे सुरक्षित नाही आहे. चोर व गावगुडांचा त्रास जनतेला तेवढाच आहे. प्रत्येक नागरिक न्याय मागेल तर कोणाकडून मागेल? म्हणून बरेच जण तक्रार देण्यापेक्षा आवरते घेता. त्यासाठी ह्या परिस्थितीवर पोलीसांनी नुसते गुन्हे दाखल न करता. दाखल केलेल्या गुन्हयांचा सखोल तपास करून,गुन्हेगारांना कडक शिक्षा ठोठावत. चोर व गावगुडांचा कायमस्वरूपी बदोबंस्त करावा.जेणेकरून जनतेला मोकळे पणाने जीवन जगता येईल, अशी रास्त मागणी गावातील समाजहित जपणाऱ्या सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.