भाजपने कोरपना तालुक्याच्या वतीने केली आज विद्युत बिलांची होळी

27

🔸विज बिल माफी बाबत राज्य सरकारने लोकांचा विश्वासघात केला – नारायण हिवरकर (भाजपा जिल्हा उपाध्यक्ष)

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-९६२३८९६५७४

कोरपना (दि.23 नोव्हेंबर ) लॉकडाऊनच्‍या काळात सर्वसामान्‍य जनतेला आलेली भरमसाठ बीज बिल पूर्णपणे माफ करावीत या मागणीसाठी आज 23 नोव्‍हेंबरला भारतीय जनता पार्टी तर्फे कोरपना येथे विद्युत बिलांची होळी करण्यात आली. येथील बस स्थानक चौकात आज २३ नोव्हेंबरला सकाळी 12 वाजता भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केलेल्या निदर्शनात राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी विद्युत बिलाची होळी करण्यात आली.

भाजप चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिवरकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनात करण्यात आले श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या मनोगतात महाराष्ट्र सरकारनी जनतेची दिशाभूल केलेली आहे विज बिल माफ करू,सातबारा कोरा करू असे अनेक आश्वासने देऊन एकही आश्वासन पूर्ण केले नसून हे निष्क्रिय सरकार जनतेला फसविण्याच काम करत आहे असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री नारायण हिवरकर,श्री किशोर बावणे,श्री शशिकांत अडकिने,श्री विजय रणदिवे सरपंच,श्री अमोल आसेकर नगरसेवक, श्री ओम पवार युवा मोर्चा,श्री दिनेश खडसे, श्री अनिल कौरासे, श्री दिनेश सुर श्री बाळू पान घाटे,श्री वसंत बहिरे, प्रमोद कोडापे माजी सरपंच,जगदीश पिंपळकर,प्रमोद पायघन, विनोद नवले सरपंच, यांचेसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्‍येने सहभागी झाले होते.