सुभाष भोसले यांना दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड 2020′ जाहीर

31

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.24नोव्हेंबर)-: शाहू हायस्कूलचे शिक्षक समाजसेवक सुभाष भोसले यांना ‘दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड कोव्हीड योध्दा २०२०’ जाहीर झालाय. कोरोनासारख्या महामारीत लॉकडाऊन काळात गोरगरीब मजूर, असहाय्य परप्रांतीयांना अडचणीच्या काळात मदत करणाऱ्या चित्रपट सृष्टीतील कलाकार, मिडिया क्षेत्रातील संपादक, पत्रकार, संशोधक, एनजीओ आदी क्षेत्रातील व्यक्तींना हा मानाचा पुरस्कार बहाल करुन सन्मानित करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ‘दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड २०२०’ च्या ट्रॉफीचं नुकतेच अनावरण करण्यात आलंय.

या पुरस्काराच वितरण सोमवारी २३ नोव्हेंबरला रोजी सायं.५ वाजता मुंबईतील अंधेरी (पूर्व) येथील हॉटेल पेनीन्सूला इथं मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमाच आयोजन दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड फिल्मकडुन कल्याणजी जाणा यांनी केलंय. हा पुरस्कार पत्रकार सुभाष भोसले यांना प्राप्त झाल्याबद्दल यांचे सर्व स्तरामधून अभिनंदन होत आहे .