शिष्यवृत्ती परीक्षेत के रामलू शाळेतील 5 विध्यार्थी शिष्यवृत्तीधारक तर, गजानन पत्तेवार तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात 60 वा क्रमांक

32

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

कुंडलवाडी(दि.24नोव्हेंबर):- फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक व माध्यमिक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यामध्ये के रामलू शाळेतील 27 विध्यार्थी पात्र तर 5 विध्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहे.

या मध्ये इ. 8 व्या वर्गातून गजानन पत्तेवार हा 230 गुण घेऊन तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात 60 वा क्रमांक प्राप्त करून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण तसेच विष्णू आरसेवार 222, अश्विनी म्याकलवार 220, कृष्णा वाडकर 208, निकिता म्याकलवार 206 हे विध्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.

या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष सायन्ना राजाराम ठक्कुरवार सचिव यशवंत संगमवार संचालिका रमा ठक्कुरवार मुख्याध्यापक अविनाश गुजेवाड प्राचार्य अभिलाष गौसूला, राजेश कागळे सर व शाळेतील सर्व शिक्षक वृन्द आदिनी सर्व विद्यार्थ्यांचे व या विद्यार्थ्यांस मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.