गंगाखेड वळण रस्ता सर्वेक्षण प्रक्रिया सुरू

30

🔸गोविंद यादव यांनी केली होती मागणी

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.24नोव्हेंबर):-गंगाखेड शहरातील वळण आणि डीपी रस्त्यांच्या सर्वेक्षण प्रक्रियेस बांधकाम विभागाने सुरूवात केली आहे. कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी राज्याचे बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांचेकडे ही कामे करण्याची मागणी केली होती. श्री चव्हाण यांनी दिलेल्या निर्देशांनंतर गंगाखेड बांधकाम ऊपविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक पाहणी केली असून या संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे लवकरच पठवला जाणार असल्याची माहिती बांधकाम ऊपविभागाच्या या वतीने देण्यात आली आहे.

परभणी जिल्हयाचे संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच परभणीत आलेल्या अशोकराव चव्हाण यांचेकडे गंगाखेड तालुका कॉग्रेसच्या वतीने विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. यात गंगाखेड शहरातील मुख्य वळण रस्ता आणि अंतर्गत डिपी रस्त्यांची कामे पुर्ण करण्याची मागणी करण्यात आली होती. यावरून बांधकाम मंत्री चव्हाण यांनी ही कामे तात्काळ मार्गी लावणेबाबत बांधकाम विभागास निर्देशीत केले. या अनुषंगाने गंगाखेड बांधकाम ऊपविभागाच्या अधिकाऱ्यांनी वळण रस्त्याची पाहणी केली. यावेळी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, बालासाहेब यादव व ईतर शेतकऱ्यांशी कनिष्ठ अभियंता बी. डी. राठोड यांनी चर्चा केली.पुढील सर्वेक्षण आणि ईतर कामे सुरू करणे बाबतचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठवला जाणार असल्याची माहीती गंगाखेड बांधकाम ऊपविभागाचे ऊपअभियंता केदार सोनवणे यांनी दिली आहे.

गंगाखेड शहराचा विकास, वाढते शहरीकरण आणि वाहतूक समस्या निवारण्याच्या दृष्टीकोनातून हा वळण रस्ता अत्यंत महत्वाचा टप्पा ठरणार आहे. म्हणून हा रस्ता आवश्यक असून तो पूर्ण करून घेण्यासाठी आपण शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष, आमदार सुरेश वरपुडकर, गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांचे विशेष सहकार्य लाभत असल्याचे गोविंद यादव यांनी सांगीतले.

वळण रस्त्यासाठी निधी ऊपलब्ध करून घेवू – आ. गुट्टे
हा वळण रस्ता होणे शहरासाठी अत्यंत आवश्यक आहे. यासाठी मी बांधकाम विभागाच्या सर्व संबंधीत अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. स्थानिक पातळीवरून तसा प्रस्ताव जाताच सर्वेक्षण आणि रस्ता कामासाठी आवश्यक असेलेला निधी शासनाकडून खेचून आणण्याचा निर्धार आ. रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केला आहे.