गुटक्याची वाहतुक करणारे वाहन सोडने पडले महाग पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबित

29

🔺पोलिस अधीक्षक जयंत मिना यांनी केली कार्यवाही

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.24नोव्हेंबर):-गंगाखेड पोलिस ठाण्यात एका पोलिस कर्मचारी याने कोणतीही चौकशी न करता गुटक्याची वाहतूक करणाऱ्या वाहनास सोडून दिल्या प्रकरणामुळे जिल्हयाचे पोलिस अधीक्षक जयंत मिना यांनी सोमवारी २३ रोजी त्या पोलिस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस कर्मचारी वसंत निळे या कर्मचा-यांने. दि.१६ नोव्हेंबर रोजी गंगाखेड येथील सारडा कॉलनीतील एका लाकडी मशीनजवळ छुप्या रस्त्याने गुटक्याची वाहतुक करणारे एक वाहन आले असल्याची माहिती निळे यांना मिळाली होती. ही माहिती मिळताच किरकोळ रजेवर असलेले गंगाखेड पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी निळे हे घटनास्थळीस येऊन त्यांनी ते गुटख्याची अवैध वाहतुक करणारे वाहन अडवले.

व त्या चालकाची कुठलीही प्रकारची चौकशी न करता वाहन सोडून दिले. ही बाब जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मिना यांना समजली. त्यांनी याबाबत चौकशी केली. गोपनिय माहिती मिळाल्यावरून जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मिना यांनी चौकशीअंती वसंत निळे यांना सोमवारी निलंबित करण्यात आले.