ग्रामपंचायतीच्या वतीने 5% अनुदान देण्यात यावे – बी. आर. व्ही. एम. यांचे निवेदन

63

🔹दिव्यांग व्यक्तींच्या न्यायाचा हक्काचा लढा

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.25नोव्हेंबर):- आज दि. 24 नोव्हेंबर रोज मंगळवार ला बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चा शाखा तोरगांव च्या वतीने दिव्यांग व्यक्तींना ग्रामपंचायतीच्या वतीने 5% अनुदान देण्यात यावे याकरिता निवेदन देण्यात आले. तसेच दिव्यांगांचा येणारा 5% निधी पूर्णतः दिव्यांगांच्या योग्य कामासाठी वापरावा असे बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चा शाखा तोरगांव यांच्या निवेदनात नमूद करण्यात आले.

निवेदनाची दखल लवकर घेऊन दिव्यांगाना न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन उभारण्याचा इशारा रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चा शाखा तोरगांव यांनी दिला.निवेदन देते वेळेस मा. रोशन मेंढे विधानसभा अध्यक्ष ब्रम्हपूरी, मा. सुखदेवजी राऊत, अपेक्षा मेंढे, अमित चुटे, श्र्वेता रामटेके, संगम मेश्राम, निखिल रामटेके, व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.