लाईट बिल तसेच मागासवर्गीयाचे महामंडळाकडून घेतलेले कर्ज माफ करा-महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे

27

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.25नोव्हेंबर):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्षाच्या वतीने माननीय निवासी जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे साहेब (नाशिक) यांची रिपाई(आठवले)पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की मोलमजुरी, कष्टकरी मागासवर्गीय तसेच शेतमजुरांना कामधंदा नाही.

अशातच महाराष्ट्र राज्याने लाईट बिलात सवलत देणार नसल्याचे मा.ऊर्जा मंत्र्यांनी जाहीर केल्याने ज्यांना कामधंदाच नाही अशा नागरिकांची लाईट बिल भरायचे कसे तसेच मागासवर्गीय सुशिक्षित बेरोजगारांनी कर्ज घेतले आहे परंतु कोरोना महामारीमुळे उद्योगचं बुडाले असल्याने ते हफ्ते भरु शकत नाही त्यांचे कर्ज माफ करावे तसेच शेतकऱ्यांचे व मागासवर्गीयांचे १०० टक्के लाईट बिल माफ करावे..

याप्रसंगी जिल्हा नेते साहेबराव तेलोरे,तालुका नेते सुनिल मेदणे, सामाजिक कार्यकर्ते बाळू साळवे,युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.