वृध्दाश्रम या लघुचिञपटाचे मनमाड येथे थाटामाटात उद्घाटन संपन्न

30

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.25नोव्हेंबर):-अण्णाभाऊ साठे यांच्या जिवनावर आधारित दिड दिवसाची शाळा ह्या लघुपटाच्या यशस्वी वाटचाली नंतर सागर आर्ट फ्लिम मनमाड प्रस्तुत नविन लघुपट घेऊन येत आहे.वृध्दाश्रम वृध्दाश्रम या लघुपटाचे चित्रीकरणाला आज मनमाड येथे सुरवात करण्यात आली.तरूण पिढीला प्रेरणा देणारा हा लघुपट ठरल्या शिवाय रहाणार नाही. असे मत निर्माता दिग्दर्शक हिरामण मनोहर यांनी चित्रीकरणाच्या वेळी व्यक्त केले.

या चित्रीकरणाला कॅमेरामन व सह निर्माता नाना आहिरे, सह दिग्दर्शक राजु लहिरे, वेषभूषा पायल महिरे आदि परिश्रम घेत असुन कलाकार गंगादादा त्रिभुवन, आनंद महिरे, वैशाली मलिक,सोनाली पगारे,रानी गांगुर्डे, ,अनिल पगारे, विकास काकडे, सचिन आहिरे तर बाल कलाकार म्हणुन प्रतिक्षा लहिरे,सम्येक पगारे आदी भुमिका साकारत आहे.या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघाचे राष्ट्रीय प्रदेश उपाध्यक्ष डॉ .राजेश साळुंके ,सामाजिक कार्यकत्या सौ.सुरेखा ढाके ,सौ.ज्योती ठाकुर ,सौ.शिला सांगळे , श्री.साजित खान ,तसेच श्री. अफरोज आत्तार अन्सारी पञकार इ.मान्यवर मंडळी उपस्थित होते.

पल्लवी मंगल कार्यालय येथे चिञिकरणाला सुरुवात झाली आहे .हा चिञपट पुर्ण करण्यासाठी सर्व स्थरातील अनेक कलावंत उपस्थित होते .हा चिञपट लवकरच वेगवेगळ्या चॕनलवरुन प्रसारीत केला जाईल असे निर्माता आणि दिग्दर्शक हिरामण मनोहर यांनी स्पष्ट केले