मंगल परिणय प्रसंगी “धम्मयान” दिनदर्शिका वितरित

52

🔹धम्म चळवळ घराघरात पोहचविण्याचा प्रयत्न

✒️सचिन सरतापे(म्हसवड-मान प्रतिनिधी)मो:-9075686100

म्हसवड(दि.25नोव्हेंबर):- आयु.दादा सरतापे,मूकदम (म्हसवड नगरपरिषद, म्हसवड) यांची कन्या आयु.नेहा हिच्या मंगल परिणय समयी उपासक आणि उपासिका यांना व जमलेल्या धम्म बांधवाना धम्मयान दिनदर्शिका वितरण भारतीय बौद्ध महासभा शाखा माण तालुका ( जि. सातारा) अध्यक्ष आयु.अरुण बनसोडे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी सचिव आयु. सचिन सरतापे, कोशाध्यक्ष,बौद्धाचार्य आयु.कुमार सरतापे,बौद्धाचार्य आयु दिनकर बनसोडे,माजी अध्यक्ष, बौद्धाचार्य आयु.सुनील भोसले,आयु.अरुण सरतापे,फुले शाहू आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आयु.चंद्रकात सरतापे व इतर धम्म बांधव उपस्थित होते.

यावेळी बोलताना अध्यक्ष अरुण बनसोडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जो आपल्या अनुयायांना तथागत गौतम बुद्धाचा धम्म दिला तो तळागाळात पोहचविण्याचे काम आज आपण सर्वांनी मनापासून आणि प्रामाणिक करणे गरजेचे आहे, त्यासाठी धम्म चळवळ हि व्यापक प्रमाणात वाढविण्याची गरज असून हे काम आपण हाती घेणे गरजेचे आहे .त्यासाठी सर्व धम्म बांधवांच्या घरी धम्म यान दिनदर्शिका असणे गरजेचे आहे.