मांणध्ये कोरोना रुग्णांत पुन्हा वाढ

31

✒️सचिन सरतापे(म्हसवड-मान प्रतिनिधी)मो:-9075686100

म्हसवड-माण(दि.25नोव्हेंबर):- तालुक्यात गेले आठ नऊ महिने किरोना ममहामारीने हाहाकार माजविलेला असून आजपर्यत माण तालुक्यातील मृत्यूची संख्या 75 होती ती आता जवळजवळ 84 च्या वर गेली आहे एकट्या म्हसवड रुग्ण मृत्यूची संख्या 32 असून माण मध्ये आज अखेर 1878 पैकी 1697 रुग्ण बरे झाले आहेत आणि उपचार घेत असलेल्या रुगणाची संख्या हि 98 आहे.

दिवाळीपूर्वी कमी झालेली रुगणाची संख्या हि मास्क न वापरणे सोशल डिस्टन्सीग न राखणे आणी सॅ निटायजरचा वाप्र न करणे यामुळे म्हसवड शहरात आणि माण रुग्ण संख्या हि झपाट्याने वाढत आहे काल एका रुगणाचा मृत्यू झाल्याने म्हसवडमधील मृत्यूची संख्या हि आता 32 झाली आहे त्यामुळे लोकाच्यामध्ये भीतीचे वातावरण झाले आहे पराकोटीची भीती लॉ कडाऊनमध्ये अनुभवलेल्या सातारा जिल्ह्याने बाधिताची संख्या कमी असताना नियम पाळले मात्र दिवाळीच्या विनाकारण मार्केट मध्ये खरेदीसाठी सहकुटूंब गर्दी करुन कोरोना वाढीचे सावट निर्माण झाले आहे.

झालेल्या गर्दीमुळे पुन्हा कोरोना पहिल्यासारखा जोमाने तर तोंडवर काढणार नाही ना अशी म्हसवड शहरात आणि संपूर्ण तालुक्यात चर्चा जोरात सुरु आहे आज पण बाजार असू देत किंवा सिद्धनाथ मंदिरात नाथाचा वार असुदेत लोक विना मास्क मोकाट फिरत असून भाविक पण मंदिरात वानाकारण गर्दी करत आहे त्यामुळे प्रशासनाची डोके दुखी वाढली आहे.प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांनी काळजीने घेतले नाहीतर कोरोना रुग्ण संख्या वाढीचा दर हा दुपटीने होणार हे निश्चित आहे.