पदवीधर मतदार संघातील 80 व 104 केंद्रांना सहायकारी मतदान केंद्र म्हणून मान्यता

29

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(दि.26नोव्हेंबर):- भारत निवडणूक आयोगाकडून नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक 1 डिसेंबर रोजी होत असून निवडणुकीच्या अनुषंगाने कोविड-19 संदर्भातील सूचनान्वये मुख्य निवडणूक अधिकारी यांचेकडे सहायकारी मतदान केंद्राचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मतदान केंद्रांची संख्या लक्षात घेता सहायकारी मतदान केंद्र म्हणून मतदार संघातील 80 व 104 प्रस्तावित करण्यात आले होते.

या केंद्राना आयोगाकडून मान्यता मिळाली आहे. त्यानुषंगाने नागपूर विभाग पदवीधर मतदान केंद्राच्या यादीत इंग्रजी व मराठी मध्ये दुरुस्ती करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी तथा सहाय्यक जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी कळविले आहे.