जिल्ह्यातील 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा 14 डिसेंबरपासून

29

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(दि.26नोव्हेंबर):-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व निर्देशांचे पालन करुन 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार जिल्हयातील शाळा दिनांक 14 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज दिली.

जिल्हयातील शाळा यापूर्वी 26 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शाळा सुरु करताना पालकांची समंती आवश्यक आहे. तसेच पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यासंदर्भात समंतीपत्र भरुन देणे आवश्यक आहे. परंतु जिल्हयातील पालकांकडून आवश्यक प्रतिसाद न मिळाल्यामुळे, बहुतांश जनतेने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर तात्काळ शाळा सुरु न करण्यासंदर्भात प्रशासनाला विनंती केली आहे. त्यामुळे जिल्हयातील शाळा सुरु करण्यासंदर्भात सर्व संबंधितांची बैठक घेऊनच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी स्पष्ट केले.

जिल्हयातील शाळांचे संपूर्ण सॅनिटॉयझेशन करण्यात येत असून या संदर्भात प्रत्येक शाळेचा अहवाल मागविण्यात येत आहे. शाळा 13 डिसेंबरपासून सुरु होत असल्या तरी शासनाने सर्व शाळांमध्ये नियमांनुसार शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य राहणार आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती यांनीही येत्या 26 नोव्हेंबरपासून शाळा सुरु करु नये अशी विनंती जिल्हा प्रशासनाला केली होती.