अर्हेरनवरगाव येथील धान खरेदी केंद्राचा शुभारंभ

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.26नोव्हेंबर):-तालुक्यातील अर्हेरनवरगाव येथे धान खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.2020-21 च्या खरीप हंगामातील शासकीय आधारभूत हमीभाव खरेदीसाठी ब्रम्हपुरी तालुक्यातील सात धान्यखरेदी केंद्रांना हिरवी झेंडी मिळाली असून अर्हेरनवरगाव येथे सेवा सहकारी संस्थेमार्फत आधारभूत धान्य खरेदी केंद्राचा आज सुभारंभ करण्यातआला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायनजी ठेंगरे मा.सदस्य जि. प.चंद्रपूर तर उद्घाटन माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष क्रीष्णाजी सहारे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून दीपक उराडे,विलास उरकुडे उपसभापती पं. स.ब्रहपुरी,मनोज ढवळे मा.सरपंच अ.नवरगाव,श्रीराम अलोने अध्यक्ष सेवा सहकारी संस्था अर्हेरनवरगाव,पुरुषोत्तम ठेंगरे उपाध्यक्ष सेवा सहकारी संस्था अ.न., प्रकाश डोलारे, ईश्वर बुल्ले, वामनराव मिसार, रामदास मिसार,हरिश्चंद्र ढवळे,झिंगर वकेकार,विनोद कावळे,सौ.सुनीता बेदरे, सौ.सुशीला देवढगले आदी उपस्थित होते.

अर्हेरनवरगाव सेवा सहकारी संस्थेचा शासकीय आधारभूत हमीभाव धान्य खरेदी चा पहिलाच वर्ष असून या आधारभूत धान्य खरेदी केंद्रामुळे परिसरातील नांदगाव,अर्हेरनवरगाव,भालेश्वर,कन्हाळगाव,कुर्झा,
तपाळ,कोथूळणा येथील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.