वरोरा येथे संविधान दिन संपन्न

33

✒️वरोरा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरोरा(दि.26नोव्हेंबर):-वरोरा येथे २६ नोव्हेंबर २०२० ला संविधान दिनाचा कार्यक्रम भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना देवून संपन्न झाला.या प्रसंगी अॕड.रोषण नकवे यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन केले,सर्व उपस्थितांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन बुद्धवंदना घेण्यात आली. संविधान दिन चिरायु होवो डाॕ.बाबासाहेब आंबेडकर अमर रहे च्या जयघोषात आसमंत भरुन गेला.

रामचंद्र सालेकर, मराठा सेवा संघ प्रणीत राज्यउपाध्यक्ष डाॕ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य यांनी या दिनाच्या औचित्यावर आपल्या भावना व्यक्त करतांना २६ नोव्हेंबर १९४९ हा दिवस या देशातील ८५% बहुजनांच्या सामाजीक राजकीय गुलामगीरीच्या मुक्तीचा दिवस असून सुवर्णाक्षरांनी कोरुन ठेवावा असा हा दिवस आहे. भारतररत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचं पाणी करुन २ वर्ष ११ महिने १७ दिवस अहोरात्र परिश्रमाने विश्वात आदर्श असे भारताचे संविधान या दिवशी पूर्ण करुन राष्ट्राला अर्पण केले. मागास शोषित वंचीत अशा सर्व मुळभारतीयांना हजारो वर्षाच्या सामाजिक धार्मिक राजकीय गुलामीच्या शृखला तोडून भारतीयय संविधानाने आजच्या दिनी आपल्याला मुक्त केले.

परंतु या देशातील शोषक वर्ग आपल्याला परत गुलाम करण्यासाठी संविधानरुपी आपला प्राण असलेलं संविधान नष्ट करु पाहत आहे. भर दिल्ली दरबारात संविधान जाळण्याची यांची मजल गेली आहे.अशा देशद्रोही विकृतींना ठेचण्यासाठी आपल्याला सावध असने गरजेचे असल्याचे सांगून आपल्या संविधानीक न्याय हक्कासाठी संविधानरुपी मिळालेल्या या आपल्या प्राणाचे रक्षण करण्यासाठी सर्व बहुजनांनी जागृक असावे असे प्रतिपादन केले. याच आपल्या संविधानाने दिलेल्या हक्क आणी न्याय मागण्यासाठी आज २६ नोव्हेंबर २०२० रोजी संविधानदिनी आयोजित केलेल्या ओबीसींच्या विशाल मोर्च्यात सर्व बहुजन बांधवांनी सहभागी व्हावे असेही त्यांनी आवाहन केले.

अॕड.रोषण नकबे यांनी संविधानाने आपल्या सर्वांना संरक्षण दिल्याने संविधानाशिवाय इतर कोणालाही घाबरण्याची गरज नसल्याचे सांगीतले.याप्रसंगी जेष्ठसामाजिक कार्यकर्ते पी.एम.डांगे साहेब यांनी संविधान हे बहुजन समाजाची व देशाची नाळ असून संविधान आहे तोपर्यंतच देश आहे,संविधान हा देशाचा प्राण आहे,त्याशिवाय देशाच्या अस्तित्वाची कल्पनाच करु शकत नाही अशा भावना व्यक्त केल्या.

याप्रसंगी दशरथजी शेंडे,भाष्कर कुडे सर,गणपत येटे सर,दिलीप टिपले सर,राजेद्र तांबेकर साहेब, राहुलजी कळसकर,महेंद्र तितरे साहेब,विजयजी झाडे,दिवाकरजी लोते, अरविंदजी कोसरकर,रेवलनाथजी लांडगे,सुखदेवजी आंबुरकर,विनोदजी बिरीया,अशोकजी गुजरत,भाऊरावजी निरंजने,वाघमारे….आदी अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॕड.रोषण नकबे यांनी केले तर आभार प्रदर्शन कुडे सर यांनी केले. सर्व जनतेला संविधानाच्या हार्दिक शुभेच्छा देवून कार्यक्रमाची सांगता झाली.