ग्रामपंचायत कार्यालय कुंटूर येथे भारतीय संविधान दिन साजरा

79

✒️चांदु आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949

कुंटूर(दि.26नोव्हेंबर):-नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे ग्रामपंचायत कार्यालय कुंटूर च्या वतीने भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आलाआणि चांदु आंबटवाड यांनी संविधानाचे वाचन केले.

देशाची अखंडता, सार्वभौमत्व,समता, एकात्मता ,आधी बाबींचा संविधानात सामाविष्ट करुन,देशप्रेमाची भावना रुजवून, लिंगभेद, जातिभेद, नष्ट करून सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत अधिकार देणारे हे संविधान भारतीय संसदेने स्वीकारले व त्याची अंमलबजावणी26 जानेवारी 1950 पासून सुरू झाली.

या संविधान दिनाच्या कार्यक्रमाला शिवानंद रेनेवाढ, माधव काळेवार, उद्धव हनुमंते, किशन गजभारे ,दिगंबर , आनंदा पा. पिंपळे, गोविंद महाडाळे, इत्यादी हजर होते.