वाढीव वीजबिल रद्द होण्यासाठी नाशिक मध्मे यहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रचंड मोर्चा

34

✒️विजय केदारे(निफाड प्रतिनिधी)मो:-9403277887

निफाड(दि.26नोव्हेंबर):- राज्यातील सर्वसामान्य जनता वाढीव विजबिलांमुळे त्रस्त असतांना राज्य शासनाचे ह्या विषयाच्या गांभीर्याकडे लक्ष नसून झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे संस्थापकीय अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचे आदेशाने पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रदीप पवार, प्रदेश सरचिटणीस मा. अशोकभाऊ मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष मा. अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष मा. अनंत सूर्यवंशी व मा. दिलीप दत्तु दातीर व शहराध्यक्ष मा. अंकुशभाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली शहर व जिल्ह्यातील मुख्य संघटना व सर्व अंगीकृत संघटना पदाधिकाऱ्यांतर्फे आज गुरुवार दिनांक २६.११.२०२० रोजी राजगड कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा प्रचंड मोर्च्याच्या माध्यमातून मा. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

जागतिक कोरोना महामारी व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय वर बंद पडून अनेकांचे संसार मोडकळीस आले आहे. याही परिस्थितीत गोरगरीब जनतेचे अश्रू पुसण्याऐवजी महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळातर्फे एप्रिल २०२० मध्ये अन्यायकारक छुपी विज दरवाढ करण्यात आली असून लॉकडाऊनच्या काळात मोठ्या रकमेची सरासरी वीज देयके देऊन जुलम करण्यात आल्याची भावना राज्यातील गोरगरीब जनतेत बळावत आहे. सरकारच्या मालकीच्याच महामंडळाच्या ह्या मोगलाई कारभारावर राज्यातील जनतेत प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला आहे.

महामंडळ ६० दिवसांच्यावर थकीत वीजबिलांवर १२ टक्के व ९० दिवसांवरील थकीत वीजबिलांवर १५ टक्के व्याज लावत असून हे सरकारी महामंडळ आहे का खाजगी सावकार असा प्रश्न गरीब जनतेला पडला आहे. त्यातही आधी वाढीव वीजबिल द्यायचे आणि ज्यांना हे भरमसाठ वीजबिल भरणे जमत नाही त्यांना संपूर्ण बिल न भरता अंशतः बिल भरायची सूट द्यायची अन उरलेल्या बिलावर गुपचूप व्याज लावायचे असा अजब कारभार महामंडळाने चालवला आहे. आधीच राज्यातील विजभार हा इतर राज्यांपैक्षा आधीच अधिक असतांना शासनाने एप्रिल २०२० पासून वीजभार (१०० युनिट करीता रु. ३.०५/युनिट वरून रु.३.४६/युनिट व त्यावर ३०० युनिट पर्यंत रु.६.९५/युनिट वरून रु.७.४३/युनिट), व्हीलिंग चार्ज (रु.१.२८/युनिट वरून रु.१.४५/युनिट) व स्थिर अधिभारांत (रु.९० वरून रु.१००) अशी भरमसाठ वाढ केली आहे.

सर्व सामान्य जनतेच्या कल्याणाकरीता चालविलेल्या सरकारनेच जर अशी लुट चालवली तर जनतेने कुणाकडे बघायचे ? आज राज्यातील गोरगरीब जनता लहान-मोठ्या समस्यांच्या समाधानासाठी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडे आशेने बघत आहे. समस्या कुठल्याही असो उत्तर फक्त राजसाहेबच आहेअशी प्रचीती आज जनतेला येत आहे.

मा. राजसाहेबांनी वीजबिल कमी होणे बाबत सरकारचे मंत्री, मा. राज्यपाल, शासक आघाडीचे ज्येष्ठ नेते मा. शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे. मात्र या विषयाचे गांभीर्य सरकारला नसून मा. राजसाहेबांनी जनतेला आता ह्या लढ्यात शामिल व्हायचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहर व जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मा. जिल्हाधिकाऱ्यांना वाढीव वीजबिल संदर्भात वीज ग्राहकांचे गाऱ्हाणे सरकार दरबारी मांडून मोठ्या रकमेची सरासरी वीज देयके, अन्यायकारक विज दरवाढ तसेच थकीत विजदेयकांवरीलवरील व्याज तात्काळ रद्द करून वीज वापरानुसार वीजबिले देऊन गोरगरीब जनतेला दिलासा द्यावा असे निवेदन देण्यात आले आहे.

या प्रसंगी मनसेचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रदिपचंद्र पवार, प्रदेश सरचिटणीस अशोकभाऊ मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष मा. अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष मा. अनंत सूर्यवंशी व मा. दिलीप दत्तु दातीर, शहराध्यक्ष मा.अंकुश पवार, ज्येष्ठ नगरसेवक सलिममामा शेख व योगेशभाऊ शेवरे, नगरसेविका नंदिनीताई बोडके, वैशालीताई भोसले, उपजिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील, सुरेश घुगे, मनोज ढिकले, संतोष सहाणे, रमेश खांडबहाले, संदीप किर्वे, संतोष पिल्ले, नितीन साळवे, सत्यम खंडाळे, भाऊसाहेब निमसे, विक्रम कदम, रामदास तात्या दातीर, प्रकाश दादा निगळ, विजय आहिरे, मिलिंद कांबळे, सचिन भोसले, अविनाश पाटील, सुनील गायधनी, शैलेश शेलार, सतीश विसपुते, प्रकाश शिंदे, प्रकाश गोसावी, नवनाथ कोठुळे, अॅड. दिलीप केदार, राजेश तापकिरे, संतोष कोरडे, पराग शिंत्रे, किशोर जाचक, प्रकाश बंटी कोरडे, नितीन माळी, निखील सरपोतदार, अमित गांगुर्डे, संजय देवरे, अक्षय खांडरे, निशांत जाधव, भाऊसाहेब ठाकरे, जावेद शेख, डॉ.किरण कांबळे, नवनाथ जाधव, अमोल चांदवडकर, अर्जुन वेताळ, कैलास मोरे, ज्ञानेश्वर बगडे, किरण क्षिरसागर, गोपी पगार, किशोर वडजे, आबा चौधरी, गणेश जायभावे, देवचंद केदारे, अतुल पाटील, जितेंद्र जोशी, सुजाताताई डेरे, कामिनीताई दोंदे, पद्मिनीताई वारे, स्वाती मगर, अरुणाताई पाटील, अनिता ठोक, ज्योतीताई शिंदे, निर्मलाताई पवार, कांचन पाटील, मुक्ताताई इंगळे, अॅड. भाग्यश्री ओझा, वृंदा आहेर, खंडेराव मेढे, संदीप भवर, शशी चौधरी, गणेश मंडलिक, कौशल पाटील, शाम गोहाड, अरुण दातीर, संदेश जगताप,ललित वाघ, सौरभ सोनवणे, तुषार भंदुरे, स्वप्नील ओढाणे, गणेश वाळके, रोहन जगताप, सागर निगळ, अजिंक्य बोडके, स्वप्नील वाघचौरे, विक्की बिऱ्हाडे, सोनू नागरे, अक्षय कोंबडे, सिद्धेश सानप, भूषण भुतडा, अमोल भालेराव, राम बिडवे, पंकज बच्छाव, विक्की जाधव, निलेश सहाणे, मयूर कुकडे, विल्सन साळवी, अमित सालीन्स, आदि पदाधिकारी तसेच महिला सेना, विध्यार्थी सेना व सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.