चार्वाक वन येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनाचे आयोजन

32

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.27नोव्हेंबर):- तालुक्यातील चार्वाक वन येथे म. ज्योतिबा फुले समता विचार मंच बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था पुसद यांच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले आहे .

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हणून प्रा. रामप्रसाद तौर सत्यशोधक विचारवंत किनवट उपस्थित राहणार आहेत .

या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून प्रा. आदिनाथ इंगोले कवी, विचारवंत ,आणि चळवळीतील अजीवन कार्यकर्ते पूर्णा जिल्हा परभणी , धम्मपाल माने संचालक साप्ताहिक धम्मसंदेश यवतमाळ हे उपस्थित राहणार आहेत.

तर प्रमुख उपस्थिती म्हणून के.डी जाधव अध्यक्ष युवक मंडळ पुसद ताहेरखा पठाण माजी नगरसेवक ,बी.जी राठोड माजी शिक्षण सभापती जिल्हा यवतमाळ, मनोहर भगत मार्गदर्शक धम्मसंगती तथा से.नि. जिल्हाधिकारी ,सदाशिवराव भालेराव से.नि. उपविभागीय पोलीस अधिकारी यवतमाळ, भीमराव कांबळे संस्थापक अध्यक्ष प्रज्ञापर्व तथा संचालक दलितांचा कैवारी, दत्तानंद गोस्वामी कार्याध्यक्ष अंनिस शाखा पुसद से.नि. उपविभागीय वनाधिकारी ,सुधाकर चापके सचिव अंनिस शाखा पुसद तथा सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता (एम एस ई.बी.) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम २८नोव्हेंबर २०२०शनिवार रोजी सकाळी ठीक १०:३० वाजता होणार आहे. संस्थेच्या वतीने सॅनिटायझर तसेच कोविड-१९ च्यानियमाप्रमाण आसन व्यवस्था केलेली आहे .आपण माक्स लावून यावे असे आव्हान संस्थेचे अध्यक्ष ॲड .अप्पाराव मैंद यांनी केले आहे.