२६/११ हा दिवस साधेपणाने घरीच राहून केला साजरा

29

🔸लाईफ फाऊंडेशन, ब्रम्हपुरीचा अनोखा ऑनलाइन उपक्रम

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.27नोव्हेंबर):- काल, दि.26 नोव्हेंबर 2020 हा दिवस आपल्या भारतामध्ये “संविधान दिवस” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जातो, तसेच, याच दिवशी 2008 मध्ये “मुंबई अतिरेकी हमला” झाला होता.. निष्पाप लोकांचे, वीर जवानांचे बलिदान आपण कसे विसरणार…

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या नियमावली पाळत, या दोन्ही दिवसाचे औपचित्य साधून, “लाईफ फाऊंडेशन, ब्रम्हपुरी” या सामाजिक संस्थेने एक आगळा वेगळा ऑनलाइन उपक्रम काल आयोजित केला होता…त्या मध्ये सर्वांनी आपल्या घरीच राहून साधे पणाने हा दिवस साजरा करावे, हे संस्थेतील शिष्टमंडळाने ठरविले होते…या उपक्रमात संस्थेच्या सामाजिक ग्रुपमधील विविध क्षेत्रातील, गावातील लोकांनी सहभाग घेऊन उत्तम प्रतिसाद दिला…सर्वांनी भारतीय📖 संविधान प्रस्ताविका संपूर्ण वाचन करीत, 2008 मध्ये मुंबई हमल्यातील शहीद👨🏻‍✈️ निष्पाप लोकांना, वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करीत, सर्वांना विनम्रतेच दर्शन घडवून आणले..

या उपक्रमात लाईफ फाऊंडेशन संस्थेच्या सचिव- कु.पुनम कुथे, सहसचिव- विपुल शेंडे, सदस्य- राहुल शेंडे, हेमाक्षी पगाडे, सुजाता जांबूळे, निशिकांत बावनकूळे, तसेच मेंडकी येथील आय.टी. कॉम्पुटर संस्थेचे संचालक- मा.अंकुश कोसरे सर, वीर शिवाजी मित्र मंडळचे अध्यक्ष- भूषण आंबोरकर, प्रशांत खोब्रागडे, खेमचंद वसाके इत्यादी लोकांनी सहभागी होत उत्स्फुर्त प्रतिसाद दिला…या उपक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष- उदयकुमार पगाडे यांनी थोडक्यात सर्वांना मार्गदर्शन करीत, कार्यक्रम समाप्त केले.