गंगाखेड तालुका ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने सत्याग्रह आंदोलन

30

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.27नोव्हेंबर):-मुख्यमंत्री सहाय्यता निधी व साखर संकलन निधी विहित वेळेत शासनाकडे जमा केला नसल्या मुळे पुण्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी तालुक्यातील माखणी येथील गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड या खाजगी कारखान्याचे क्रशिंग लायसन रद्द केल्या मुळे या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा ऊसाचा प्रश्न गंभीर झाला आहे.

या कारणामुळे आज दिनाक 27 नोव्हेंबर रोजी गंगाखेड तालुका ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने गंगाखेड तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले या आंदोलनाद्वारे त्यांनी गंगाखेड शुगरला गाळप परवाना देण्यात यावा आणि सूड सूडबुद्धीने गाळप परवाना रद्द करणाऱ्या आयुक्ताला निलंबित करण्यात यावे अश्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.