पाळधी गावातील शेतजमीन भूसंपादनाचा मोबदला केव्हा मिळणार ?

26

✒️जामनेर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

जामनेर(दि.27नोव्हेंबर):-तालुक्यातील पाळधी गावातील कमानी तांडा योजनेअंतर्गत शेतकरी यांच्या जमिनी प्रकल्पासाठी भुसं पादित करण्यात आल्या आहेत. सदरील जमिनी या शासनाने 1999 साली युती शासनाच्या काळात तत्कालीन मंत्री एकनाथराव खडसे यांनी प्रकल्पास मान्यता देऊन शेतकरी यांच्या जमिनी प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्या आहेत. परंतु या जमिनीचा कोणत्याही प्रकारचा मोबदला अजूनपर्यंत मिळाला नसल्याने पाळधी गावातील शेतकरी यांनी 27 तारखेपासून लघु पाटबंधारे विभागात आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.

सदरील उपोषण सुरू झाले असता कार्यकारी अभियंता श्री एस सी अहिरे साहेब यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्यांची सर्व अडचणी जाणून घेऊन त्यांच्या प्रकरणात लक्ष घालून त्रस्त शेतकरी यांना दिलासा देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर कागदपत्राची पूर्तता करण्यात आली आहे. तसेच येत्या 8 दिवसात हाई कोर्ट मध्ये दाखल याचिकेवर सर्कुलेशन लावून लवकरच निकाल घेण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.

शेतकरी यांनी लेखी आश्वासन घेतल्यानंतर उपोषण सोडण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता श्री एस सी अहिरे, शेतकरी सोपान सोनवणे, शलिक बाविस्कर, दिलीप पाटील, कैलास शेवाळे, समाधान पाटील, वकील किशोर पाटील, सुरेश पाटील, संजय पाटील तसेच इतर शेतकरी उपस्थित होते.