कवि विशाल इंगोले (अजातशत्रु ) राज्यस्तरिय काव्यभूषण पुरस्काराने सन्मानित

33

✒️अमरावती(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अमरावती(दि.27नोव्हेंबर):- भजनसम्राट ह.भ.प स्व.विठोबा अ .मरवडे सामाजिक प्रतिष्ठान रायगड या सामाजिक प्रतिष्ठान मार्फत साहित्य क्षेत्रात देत असलेल्या योगदानाबद्दल व त्यांच्या काव्यशैलीच्या माध्यमातून सातत्याने करित असलेल्या प्रबोधनात्मक कार्याचा गौरव म्हणुन कवि .विशाल इंगोले (अजातशत्रु ) यांना भजनसम्राट कवी तथा गायक ह.भ .प. विठोबा अ .मरवडे स्मृती पित्यर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री .नंदकुमार मरवडे यांच्या हस्ते राज्यस्तरिय काव्यभूषण पुरस्कार आँनलाईन देण्यात आला.

कवि .विशाल इंगोले(अजातशत्रु ) हे चांदुर बाजार तालुक्यातील चिंचोली काळे या गावचे असुन त्यांच्या या कार्यामुळे गावाचा व तालुक्याचा मान उंचावला .त्यांच्या साहित्य क्षेत्रातील हा पहिलाच पुरस्कार असुन याचे संपुर्ण श्रेय त्यांनी त्यांचे आईबाबा ,गझलकार नितिनजी देशमुख ,त्यांच्या शिक्षिका प्रियदर्शनी देशमुख मँडम (गो .सी .टोम्पे काँलेज चां .बाजार ),तुषारदादा उमाळे ,श्री .देविदास मेटांगे सर तसेच मित्रमंडळी यांना देतात .असे युवा कवि विशाल इंगोले (अजातशत्रु ) यांनी सांगितले .