या वेळेस शिक्षकांमधील शिक्षकच आमदार होणार – प्रा. श्री शरद यादव

44
✒️नितीन राजे(खटाव,जिल्हा सातारा- विशेष प्रतिनिधी)मो:-9822800812

सातारा(दि.27नोव्हेंबर):-पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील शिक्षक उमेदवार श्री नंदकिशोर बबनराव गायकवाड यांच्या प्रचार सभेत म्हसवड येथे ते बोलत होते .नंदकिशोर गायकवाड हे शिक्षकांमधील लोकप्रिय असे संघर्षशील उमेदवार आहेत.जुनी पेन्शन मिळवण्यासाठी ,सेवाजेष्ठतेचा मुद्दा निकाली काढण्याकरिता ,त्याचबरोबर समान काम समान वेतन, स्वच्छ प्रशासन यासारख्या शैक्षणिक समस्यांवर धडाडीने विधानपरिषद गाजवू शकणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी पाचही जिल्ह्यातील शिक्षक मतदार बंधू-भगिनी उभे आहेत.

यावेळेस बऱ्याच राजकीय पक्षीय संस्थापकांचे उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.त्यामध्ये त्यांनी वापरलेली दबाबतंत्रे ही लोकशाही मूल्यांचा गळा घोटणारी आहेत,शिक्षकांच्या निवडणुकीत राजकीय पक्षाची गरजचं काय?बहुतांश शिक्षक हे व्यक्त न होता आतल्या आत धुमसत आहेत.शिक्षक हा स्वतंत्र विचारांचा,बुद्धीजीवी माणूस असतो त्यामुळे धुमसत असलेला हा ज्वालामुखी उत्स्फूर्तपणे बाहेर पडेल.
विधानपरिषदेत शिक्षकांचे प्रश्न मांडण्याकरिता शिक्षकच उमेदवार असला पाहिजे,या भूमिकेतून रयत मधील शिक्षक नंदकिशोर गायकवाड हे पसंती क्रमांक एकची भरघोस मते मिळवून प्रस्थापित पक्षीय राजकारणीय उमेदवारांना धोबीपछाड देतील असा दृढविश्वास प्रा. श्री शरद यादव सर यांनी व्यक्त केला. ते रयत सेवक मित्र मंडळ संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत