व्यसन सोडा आरोग्यास वाचवा !

    141

    आपला भारत देश शेतीप्रधान देश आहे . एकीकाळी भरपूर शेती सगळीकडे हिरवळ , डोंगर कपारी , त्यामुळे जनावरें शेळ्या , मेंढ्या , भरपूर असायच्या खायला सकस आहार दुध आणि शेतीमधील ताजा भाजीपाला यात प्रोटिन प्रमाण जास्त . शेनखताचा वापर केला जात असे . अशी बाजारी खते उपलब्ध नव्हती , त्यामुळे जमीनीचा धामू जसाच्या तसा राहत असे.

    वरिल प्रमाणे खाण्यास सकस आहार पौष्टिक आहार मिळत असल्यामुळे त्यावेळचे लोक वाघाच्या जबड्यात हात घालायचे धाडस होते . बुकी मध्ये रेडा मारायची ताकद , दांडपट्टा , घोडेस्वारी , तलवारबाजी , लठठबाज , कुस्ती मल्लविद्या , कबड्डी , खो-खो , असे मैदानी खेळ खेळण्याचा आनंद वेगळाच होता . हे सांगण्याच्या पाठिमागील हेतू एवढाच आहे , त्यावेळी व्यक्तीना कोणतेही व्यसन नव्हते.

    आज काळ बदलला आहे . तरुण पिढी व्यसनी होत आहे ‌. त्याला कारणीभूत आहे ते म्हणजे संगत , कामामध्ये होणार बदल , नोकरिसाठी बाहेर राहणारी मुले , व्यसनी होताना दिसतात . मित्रांचे मन राखण्यासाठी सर्व जण करतात, म्हणून असे बरिच कारणे व्यसनी होण्यास कारणीभूत ठरतात.व्यसनाधीनता मध्ये तंबाखू , गुटखा , अफू , चरस , गांजा , दारु , फेणी (पावडर) आता नवीन आलेल्या नशेच्या गोळ्या , पानातून होणारी नशा , शासन निर्णयानुसार शाळा कॉलेज शेत्र म्हणजे १०० मिटर अंतरावर एकहि तंबाखू जन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी घातली आहे.

    पण आपण पाहतो असे व्यसनी पदार्थ व खुलेआम विक्री केले जातात . असे पदार्थ बंदच्या काळात डबल पैसे देऊन खरेदी केली जातात . अशा तंबाखू जन्य पदार्थांतावर हे खाणे आरोग्यासाठी अपायकारक आहे असे लिहलेले असलेतरी , लोकं खातात पितात ते कसे याचा व्यवसाय करणार्या कंपन्या लाखों करोडो मध्ये उलाढाल करतात.आमच्या बांधकाम कामगारांवर व्यसनी , गरिब , गरजूं , अडाणी , असा ठपका ठेवला आहे . कामगार कामांचा शिण जातो म्हणून पीतात . माझ्या बांधवांनो तुमचे दुःख मला कळते , पण दारू पिऊन कोणताही त्रास , टेन्शन , कंटाळा जात नाही , उलट दारू पिऊन आपण आपल्याला देवाने दिलेले लाख मोलाचे शरिर आपण संपवून टाकतो.

    वरिल प्रमाणे व्यसनी व्यक्तीकडून विविध गुन्हे होतात , चोरि , खून , मारामाऱ्या , खंडणी अपहरण , बलात्कार , असे विविध गुन्हे आपणास व्यसनी व्यक्तीकडून झालेले आढळतात . घरात आई – वडील , पत्नी , मुले, यांना मारहाण करणे , जागा जमीन घरातिल भांडी विकून दारु पिणारे लोक आहेत . समाजात किंमत नाही , मित्रांमध्ये बसायला जागा नाही , दारुडे मित्र असल्यास जागा आहे . व्यसनी लोकांनी मित्र बनवू नयेत , कारणं या मित्राची तुमच्या मुली व पत्नी त्यांचेवर वाईट नजर असते , मी असे काही व्यसनी लोक पाहिले आहेत . कि ते दारु साठी चाकरि करताना दिसतात.

    असे जर झाले तर व्यसनी लोकांना त्यांची मुले, आई – वडील पत्नी, रोजच्या भांडणाला कंटाळून घर सोडून जातात . नाहितर आत्महत्या सारखे मार्ग निवडतात . आणि आपलीं जीवन यात्रा संपवतात.

    ‌‌ वरील प्रमाणे व्यसनामुळे आपले जीवन बरबाद होणार असेल तर . व्यसन वरदान ठरु शकतं नाही . इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेणाऱ्या व्यक्तिला वार्षिक अनुदान देणेत येते . त्यासाठी आपली नोंदणी मंडळाकडे असणे गरजेचे आहे . शासन वारंवार मेळावे समुपदेशन केंद्र घेवून व्यसनमुक्ती साठी सल्ला देणेचे अनमोल काम करत आहेत.

    बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर यांचें वतीने आम्ही आवाहान करतो , कोणत्याही व्यसनापासून मुक्ती पाहिजे असेल तर संपर्क साधा.

    व्यसन सोडा आरोग्यास वाचवा ,
    व्यसनी शरिर रोगी शरीर ,
    व्यसन सोडा निरोगासी नाते जोडा ,
    आजच शपथ घ्या ……

    ✒️लेखक:-अहमद नबीलाल मुंडे(संस्थापक अध्यक्ष बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर)मो:-९८९०८२५८५९