पोलीस उपनिरीक्षक भिमराव ग्यानोबा कांबळे यांना कोवीड-१९ योद्धा गौरव प्रदान

    204

    ?कंन्ट्रोल क्राईम अन्ड इन्फॉर्मेशन डिटेक्टिव्ह ट्रस्टने दिला पुरस्कार

    ✒️शिवानंद पांचाळ(नायगाव,शहर प्रतिनिधि)मो:-9960748682

    कोरोना व्हायरस / कोवीड-१९ या जागतिक महामारीच्या संकट कालखंडात नायगांव पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक भिमराव कांबळे व सर्व पोलीस स्टाॅप आपल्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र २४ तास अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहेत नायगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहरात व ग्रामीण भागातील गांवामध्ये शांतता रहावी तसेच कोवीड-१९ विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या जिवाची कुठलाही पुरावा न करता उल्लेखनीय भुमिका बजावली आहेत त्यांच्या या कर्तव्य दक्ष कार्याचा सन्मान व्हावा यासाठी कंन्ट्रोल क्राइम अन्ड इन्फॉर्मेशन डिटेक्टिव ट्रस्टच्या वतीने ट्रस्ट चे नांदेड जिल्हा प्रमुख शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी कोवीड-१९ योद्धा विषेश सन्मानपत्र देउन गौरव कले.

    आणि त्यांच्या कार्याची प्रशंसा केली, यावेळी दैनिक कुलस्वामिनी संदेश चे नांदेड विभागीय संपादक संदिप कांबळे. राजेंद्र कांबळे अंकुश गायकवाड देगांवकर श्याम सुवर्णकार.संभाजी पांचाळ सचिन फुलारी.सचिन गायकवाड देगांवकर ऋषिकेश उपस्थित होते, नायगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक भिमराव कांबळे यांना कोवीड-१९ योद्धा पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

    कोरोना सदृश्य या आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टर नर्स पोलीस कर्मचारी रेल्वे कर्मचारी पत्रकार समाज सेवक साहित्यिक व ईतर बांधव भगिनीं यांच्या मुळेच आज आपण सर्वजण सुखरूप आहोत अशा कोरोना योद्धाचा सन्मान करणे आमचे भाग्य आहे,असे मत ट्रस्ट चे नांदेड जिल्हा प्रमुख शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर आमच्या वृत्तपत्राशी बोलताना व्यक्त केले,