वंचित बहुजन आघाडी चे लातूर जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांना अहमदपूर येथे श्रध्दांजली अर्पण

29

✒️संजय कांबळे माकेगावकर(अहमदपूर प्रतिनिधी)मो:-9860208144

अहमदपुर(दि.28नोव्हेंबर):-वंचित बहुनज अाघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे व त्यांचे नातलग औंरगाबादला जात असताना गेवराईनजीक त्यांच्या गाडीचा व कंटेनरचा अापघात झाल्याने त्यात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे,त्यांचे चुलतभाऊ सुभाष भिंगे त्यांचे चुलते राम भिंगे व त्यांचे नातेवाईक यांचे निधन झाले.भिंगे मागच्या वर्षभरापासुन पदावर कार्यरत होते त्यांच्या जाण्याने वंचित बहुजन आघाडी मध्ये नक्कीच पोकळी निर्माण झाली अाहे.

अहमदपूर तालुका वंचित बहुजन अाघाडीच्या वतीने डाॅ.बाबासाहेब अांबेडकर पुतळ्याजवळ श्रध्दांजलीचा कार्यक्रम घेण्यात अाला.यावेळी साहित्यीक विद्रोही कवी राजेंद्र कांबळे,वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल दहीकांबळे,प्रल्हाद ढवळे, नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीज चे जिल्हा समन्वयक तथा पत्रकार बाबासाहेब वाघमारे,विनय ढवळे,भगवान ससाणे,राहुल कांबळे,समर्थक विद्यार्थी आंदोलनाचे सारिपुञ ढवळे,रत्नाकर चौथरे, राम कांबळे,श्याम कांबळे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल तलवार, विनोद नामपल्ले अादि मान्यवर उपस्थित होते.

भिंगे यांना श्रृध्दांजली अर्पण करताना विद्रोही कवी तथा जेष्ठ राजेंद्र कांबळे यांनी भिंगे यांच्या अकस्मीत जाण्याने चळवळीची खुप मोठी हानी झाली असुन त्यांचे सामाजिक ,शैक्षणिक व राजकिय क्षेञात मोठे योगदान होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुञसंचलन विनय ढवळे यांनी केले.