क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३०व्या स्मृती दिना निमीत्त सिन्नर येथे अभिवादन

31

✒️सिन्नर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सिन्नर(दि.28नोव्हेंबर):-क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३०व्या स्मृती दिनानिमीत्त महामिञ परिवार व आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामिञ दत्ता वायचळे म्हणाले की, महात्मा फुले हे विचारवंत, समाजसुधारक होते.उच्चवर्णीयांकडून होणा-या अन्यायापासुन,अत्याचारापासुन व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरेगामी विचारांची मांडणी केली.व स्ञी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. छञपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी शोधून पहिली जयंती साजरी केली.

आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी ब्रिटीश सत्ता, सावकारशाही,यांच्या गुलामगिरी विरूध्द बंड करून क्रांती घडविली. त्यांच्या क्रांतीचा उल्लेख त्यांच्या वांङगमयात केला आहे. महात्मा फुले यांनी केलेल्या महान कार्यामुळे जनतेने त्यांना महात्मा हि उपाधी बहाल केली. त्यामुळे जनता त्यांना महात्मा फुले म्हणु लागले. अशा महान क्रांतिसुर्यास विनम्र अभिवादन करून मोकळे होण्यापेक्षा त्यांचा विचार सामान्य माणसाच्या मनात रुजविणे आवश्यक आहे.

या प्रसंगी डॉ जी एल पवार, कैलास झगडे, चंद्रकांत माळी, दत्ता जी गोळेसर, संजय शिंदे आदिंनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सुञसंचलन विजय मुठे, प्रास्थाविक रावसाहेब आढाव यांनी केले तर उपस्थितांचे आभार रामु इदे यांनी मानले.यावेळी महामिञ दत्तावायचळे, डॉ जी एल पवार, रावसाहेब आढाव,रामु इदे,विजय मूठे,राजेंद्र बेंडकुळे,कैलास झगडे, दत्ता गोळेसर,चंद्रकांत माळी, सुनिल लोणारे,पंढरीनाथ मांगटे, संजय शिंदे, ज्ञानेश्वर लोणारे, शिवाजी सातभाई, नितीन शिंदे अदि उपस्थित होते.