बिबट्याचा धुमाकूळ बंद करा नसता वनविभाग जबाबदार कोण अधिकारी यांचेवर ३०२ गुन्हे दाखल करा – अड रवीप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख

31

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114/ 9404223100

गेवराई(दि.28नोव्हेंबर):-भगवान गड,आपेगाव,किन्ही अश्या अनेक वेगवेगळ्या भागात शेतकरी बांधवांना वनविभागाच्या हलगर्जी पणामुळे माझ्या शेतकरी, कष्ट करणाऱ्या शेतमजुराचा ,कामगारांचा,गुरख्यचा तसेच आज पेरणी लागवडी वेळी शेतात मोटार, दारे धरणाऱ्या शेतकऱ्याला, जनावरे चरणाराला अन्य शेतऱ्यांनाही याचा त्रास होतो व राज्यातील शेतकरी बांधवांना भयभीत झाले असताना वनविभाग मात्र झोपेच्या सोंगात दिसून येत आहेत बाकी काही लोक प्रतिनिधी भेटी देऊन स्वतः मोठ्या पना मिरवण्यात गुंतले आहेत.

याच्याशी माजी लोक प्रतिनिधी ही भेटीचा देखावा तयार करून आपले राजकीय दुकान थाटत असताना रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस सर्व विभाग प्रमुख तथा जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख सर्कल प्रमुख व शेतकरी बांधवांना सोबत घेऊन वनविभाग व खात्याचे मंत्री यांच्या तोंडाला काळे लावू लवकरच बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी नुसत्या पोकळ डोलारा बंद करा बिबट्याला पायबंद घालण्यासाठी आपल्या परीने उपाय योजना करण्यासाठी पाऊले उचलली पाहिजेत बरेच बळी बिबट्याने घेतले अजुन किती बळी वनविभाग व सरकार घेणार आम्ही शेती व भरणा करण्यासाठी दिवसा लाईट मागतो देत नाही.

नुकतेच जालना भोकरदन तालुक्यात तीन भावंडांचा बळी गेला येथे महावितरण कंपनीच्या वतीने अनेक नेते भेटी देऊन मोकळे झाले माझ्या शेतकरी भावंडांचा बळी गेला हे दुर्दैव आहे भेटी सत्वंन नको माझ्या शेतकरी वर्गाला मदत होईल असा शासन स्तरावर निर्णय सरकारने तत्काळ घेतला पाहिजे नसता रयत शेतकरी संघटना हातात आसूड घेऊन जाब विचारण्याची वेळ आली असा प्रश्न राज्यातील शेतकरी व संघटनेचे पदाधिकारी आमच्याकडे करत असून सरकारने तत्काळ कारवाई करावी अशी मागणी रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य प्रदे अध्यक्ष अड रवी प्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख यांनी आमच्या प्रतिनिधी यांचेशी बोलताना सांगितले