चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील 21 वर्षीय जवान यश दिगंबर देशमुख यांना आले वीर मरण

28

🔺श्रीनगर येथे एका दहशतवादी भ्याड हल्ल्यात झाले शहीद

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

चाळीसगाव(दि.28नोव्हेंबर):-तालुक्यातील पिंपळगाव येथील जवान यश देशमुख हा श्रीनगर येथील प्यारा मिलिटरी मधील जवान दिनांक 27 रोजी शहीद झाल्याची माहिती प्राप्त झाले होती. श्रीनगर येथे दहशदवादी हल्ल्यात 27 रोजी दुपारी चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील जवान यश डिंगम्बर देशमुख यांना वीर मरण आले आहे. यश देशमुख हा वर्षभरापूर्वीच सैन्यदलात देशाची सेवा करण्यासाठी भरती झाला होता. खडतर प्रशिक्षणा नंतर त्याची नेमणूक जम्मू-काश्मीर येथे झाली.

आणि तेथे आपले कर्तव्य पार पाडत असताना त्यांना दिनांक 27 रोजी अचानक दहशदवादी हल्ल्यात वीर मरण आले, यशला आधीपासूनच सैन्यदलाचे आकर्षण आणि आवड होती, त्यासाठी त्याने अथक परिश्रम घेतले, आणि तो जून 2019 मध्ये सैन्यदलात भरती झाला होता. वीर मरण आलेल्या शहीद जवान यांच्या पश्चात आई, वडील दोन बहीण, एक भाऊ असा परिवार आहे. यश हा शहीद झाल्याची बातमी आली आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली.

त्यातच त्याच्या आई-वडिलांना सायंकाळपर्यंत यश देशासाठी शहीद झाल्याचे त्यांना कल्पना कुणी दिली नव्हती, त्यांना सदर बातमी सांगण्याची कोणी लवकर हिंमत केली नाही, या घटनेनंतर चाळीसगावचे तहसीलदार अमोल मोरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला, शहीद जवान यश देशमुख हा आपल्या देशासाठी शहीद झाल्याची बातमी त्यांच्या कुटुंबियांना सायंकाळी उशिरा देण्यात आली, त्यानंतर परिवाराने एकच हंबरडा फोडला, शहीद झालेल्या देशमुख हा मराठा रेजिमेंट 101 बटालियनचा जवान असल्याची माहिती मिळाली आहे, श्रीनगर येथे सुरक्षेसाठी विविध पॉईंटवर जवान तैनात केले होते, त्यातील दोन पॉईंटवर यश देशमुख आणि त्याच्या सोबतचा साथीदार उत्तर प्रदेश येथील जवान होता.

हे दोन्ही जवान ज्या ठिकाणी कर्तव्य बजावत होते, अचानक तीन दहशतवादी आले आणि त्यांनी अंदाधुंदी गोळीबार करत यश आणि त्याचा साथीदार जवान यांना गंभीर रित्या जखमी केले, यात दोघेही जवानांना वीर मरण आले.आणि ते देशासाठी शहीद झाले. दरम्यान पंचक्रोशीत गावांना शहीद जवानांची पार्थिवाची ओढ लागली असून, संपूर्ण पिंपळगाव हे शोक सागरात बुडालेले आहे. दरम्यान गावात काल पासून एकही चूल पेटली नाही नाही.

दहशतवाद्यांचा या भ्याड हल्ल्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे. भारताने या भ्याड हल्ल्याचा लवकरात लवकर बदला घ्यावा अशी सर्वत्र मागणी होत आहे. यशचे पार्थिव आपल्या मूळ गावी दिनांक 28 पर्यंत येईल असा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे, याबाबत अधिकृत माहिती कळताच माहिती दिली जाणार असल्याचे तालुका प्रशासनाने सांगितले आहे.