वंचित बहुजन युवा आघाडीचे “ऑनलाईन सदस्य नोंदणी” चे कामाला प्रारंभ

35

✒️सचिन सरतापे(म्हसवड-मान प्रतिनिधी)मो:-9075686100

म्हसवड(दि.29नोव्हेंबर):- वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने “ऑनलाईन सदस्य नोंदणी” सुरू करण्यात आली आहे. त्या “ऑनलाईन सदस्य नोंदणी गुगल फॉर्म” सार्वजनिक करीत युवा आघाडी सदस्य नोंदणी मोहीमेस माण तालुक्यात सुरुवात झाली असून वंचित बहूजन युवा आघाडी माण तालुक्यात सचिव युवराज भोसले यांचे नेतृत्वाखाली युवा आघाडीची बांधणी सुरू करण्यात आली.

30 नोव्हेंबर २०२० पासून तालुका कार्यकारणी तालुक्यातील विविध भागात दौरे प्रारंभ करणार आहेत. ” गाव तेथे शाखा आणि वार्ड तेथे बोर्ड” ही मोहीम तालुकाभर उभारली जाणार असून घर तेथे वंचित युवा आघाडीचा कार्यकर्ता निर्माण करण्याचा संकल्प तालुका सचिव व पदाधिकारी यांनी केला आहे.

त्याअनुषंगाने युवा आघाडीच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी गुगल फॉर्म” सार्वजनिक करीत युवा आघाडी सदस्य नोंदणी ऍड बाळासाहेब उपाख्य प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार नोंदणीस तालुक्यात सुरुवात झाली आहे.

या नोंदणी मोहिमेत हजारोच्या संख्येने युवा कार्यकर्त्यांनी नोंदणी करून युवा आघाडीत सहभागी होण्याचे आवाहन माण तालुका वंचित बहुजन आघाडी सचिव युवराज भोसले यांनी केले आहे.