धावपटू ललिता बाबर याची माणगाव तहसीलदार पदी नेमणूक

29

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड(माण)

मो:-9075686100

म्हसवड(दि.29नोव्हेंबर):-‘माणदेशी एक्स्प्रेस’ म्हणून ओळखली जाणारी आणि ऑलिम्पिक मध्ये भारत देशाचे प्रतिनिधित्व करणारी माण तालुक्यातील मोही गावची सुवर्ण कन्या धावपटू ललिता बाबर याची रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात तहसीलदार पदी नेमणूक करण्यात आली त्यांनी तहसीलदार पदाचा पदभार शनिवारी स्वीकारला क्रीडा कोट्यातून त्याची तहसीलदार पदी निवड झाली.

असून सामान्य शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या ललिता यांना शालेय जीवनापासूनच क्रीडा क्षेत्रात आवड असल्यामुळे विविध स्पर्धामध्ये त्यांनी यश संपादन केले होते त्यामुळे त्याची निवड होणे अपेक्षितच होते त्याच्या या निवडीमुळे क्रीडा क्षेत्रातून आणि त्यांच्या मोहि या मूळ गावातील जनतेतुन समाधान व्यक्त होत आहे.